एक्स्प्लोर

India 5th Largest Economy : भारत ब्रिटनच्या पुढे, आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, 'हे' देश आहेत भारताच्या पुढे

Indian Economy News : भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. जागतिक पातळीवर भारतानं ब्रिटनला मागे टाकलं आहे.

India Becomes Fifth Largest Economy in World : जगभरात पुन्हा एकदा भारताचा डंका पाहायला मिळत आहे. ब्रिटनला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावरील जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. एका दशकाआधी या क्रमवारीत भारताचा क्रमांक अकरावा होता. मात्र आता भारत या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कधी काळी ब्रिटिशांचं राज्य असणारा भारत आता ब्रिटनला मागे टाकत अग्रेसर ठरला आहे. भारत आता अमेरिका (America), चीन (China), जपान (Japan) आणि जर्मनी (Germany) या देशांनंतर जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. 

भारताने 2021 वर्षी शेवटच्या तिमाहीमध्ये ब्रिटनच्या पुढे जात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जीडीपीच्या नव्या आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत भारताने आर्थिक महसूल वाढवला आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था 2027 पर्यंत ब्रिटनच्या पुढे असेल असा अंदाज आहे. त्याचबरोबर यंदा भारतीय अर्थव्यवस्थेत सात टक्क्यांहून अधिक वाढ अपेक्षित आहे.
 
भारतीय शेअर्सवरील जागतिक गुंतवणुकीचा परिणाम

या तिमाहीत भारतीय शेअर्समध्ये जागतिक गुंतवणुकीमुळे देशाने एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये चीननंतर दुसरे स्थान मिळवलं आहे. तिमाहीच्या शेवटी डॉलरच्या विनिमय दराचा वापर करून, रोखीच्या बाबतीत मार्चमधील तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 854.7 डॉलर बिलियन होता, तर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा आकार 816 डॉलर इतका होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF) माहिती आणि ब्लूमबर्ग टर्मिनलवरील संगणक सॉफ्टवेअर वापरून  ऐतिहासिक विनिमय दरांचा वापर करून ही आकडेवारी काढली जाते.

दरम्यान, या यादीत ब्रिटनची अर्थव्यवस्था आणखी घसरू शकते, असं तज्ज्ञांचे मत आहे. दुसऱ्या तिमाहीत ब्रिटनचा जीडीपी केवळ एक टक्क्यांनी वाढला आणि चलनवाढीनंतर 0.1 टक्के कमी झाला. येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था आणखी बळकट होईल. जागतिक पातळीवर भारताच्या योगदानातही भर पडत आहे. तसेच विदेशी कंपन्याचे भारतीय कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे, ही भारतासाठी चांगली बाब आहे.

रुपयाच्या तुलनेत पाऊंड घसरला

रुपयाच्या तुलनेत पाऊंड घसरला आहे. या वर्षी भारतीय चलनाच्या तुलनेत पाऊंड आठ टक्क्यांनी घसरला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचीच्या अंदाजानुसार, आशियाई महासत्ता बनण्याच्या मार्गावर असलेल्या भारताने या वर्षी वार्षिक आधारावर डॉलरच्या बाबतीत ब्रिटनला मागे टाकलं आहे, फक्त अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी नंतर. एका दशकापूर्वी, भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 11 व्या क्रमांकावर होता तर ब्रिटन पाचव्या क्रमांकावर होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget