Agni 5 : भारताला मोठं यश, 5000 किलोमीटर रेंज असलेल्या अग्नि 5 चं यशस्वी परीक्षण, संपूर्ण चीन, यूरोप आफ्रिकेचा काही भाग मिसाईलच्या टप्प्यात
Agni 5 Testing: अग्नि-V ची रेंज 5000 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. याच्या रेंजमध्ये पूर्ण चीन येते. इतकंच नाही तर यूरोप आणि आफ्रिकेचा काही भाग देखील याच्या मारा करण्याच्या क्षमतेत येतो.

नवी दिल्ली : ओडिसाच्या चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज येथून मध्ये अंतराची बॅलेस्टिक मिसाईल अग्नि-5 चं यशस्वी परीक्षण करण्यात आलं. संरक्षण मंत्रालयाच्या नुसार या परीक्षणात सर्व संचालन आणि तंत्रज्ञानाच्या मानकांची पुष्टी झाली. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीत करण्यात आली.
अग्नि -5 हे जमिनीवरुन जमिनीवर मारा करणार एकमेव आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइल आहे. अग्नि -5 मारक क्षमता 5000 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. या रेंजमध्ये संपूर्ण चीन येतो. याशिवय यूरोप आणि आफ्रिकेचा काही भाग देखील येतो. या मिसाईलमध्ये मल्टीपल इंडिपेंडेंटी टार्गेटेबल री-एंट्री वेईकल्स तंत्रज्ञानाचा समावेश आहे. म्हणजे हे क्षेपणास्त्र एकदा लाँच केल्यानंतर अनेक टार्गेटवर हल्ला करु शकतं. अग्नि-5 मध्ये दीड टनापर्यंत अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे.
अग्नि -5 चा वेग मॅक 24 आहे, म्हणजेच आवाजाच्या वेगाच्या 24 पट अधिक आहे. या क्षेपणास्त्राची लाँचिंग यंत्रणा कॅनिस्टर तंत्रज्ञानावर आधारित आहे. या कारणामुळं याची वाहतूक करणं देखील सोपं आहे. सध्या भारताशिवाय केवळ आठ देशांकडे इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल आहे. रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इस्त्रायल, ब्रिटन आणि कोरियाचा समावेश आहे.
अग्नि 5 क्षेपणास्त्र एक प्रगत मल्टीपल इंडिपेंडेंटली- टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल तंत्रज्ञानासह सज्ज आहे. सामान्य क्षेपणास्त्रामध्ये केवळ एका ठिकाणी विस्फोटक घेऊन जाण्याची क्षमता असते. तर, MIRV क्षेपणास्त्र एकावेळी अनेक वॉरहेड कॅरी करु शकतात. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच क्षेपणास्त्राद्वारे शेकडो किलोमीटर अंतरावरील अनेक टारगेसवर हल्ला केला जाऊ शकतो. गरज पडल्यास एकाच ठिकाणी अनेकदा हल्ला करता येऊ शकतो.
अग्नि -5 क्षेपणास्त्र डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून विकसित करण्यात आलं आहे. डीआरडीओकडून याची मारक क्षमता 7500 किलोमीटरपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अग्नि 5 च्या विकसित क्षेपणास्त्राची क्षमता वाढवण्याचा डीआरडीओकडून प्रयत्न करण्यात येत असून बंकर बस्टर बॉम्बचा त्यात समावेश करण्यासंदर्भातील संशोधन सुरु आहे.

























