India : इतिहासात आजचा दिवस खास; 75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तिरंग्याचा स्वीकार; काय आहे इतिहास?
India : इतिहासात आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. कारण 22 जुलै 1947 रोजी भारताचा ध्वज स्विकारण्यात आला.
India : आज 22 जुलै. इतिहासात आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. कारण 22 जुलै 1947 रोजी भारताचा ध्वज स्वीकारण्यात आला. घटना समितीची स्थापना झाल्यानंतर समितीने 22 जुलै 1947 ला या ठरावाला मंंजुरी दिली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा ध्वज आपल्या भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून फडकविण्यात आला. हा राष्ट्रीय ध्वज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकविण्यात आला. याच निमित्ताने आपल्या राष्ट्रीय ध्वजासंबंधित अधिक माहिती जाणून घेऊयात.
राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास :
आपल्या भारतीय झेंड्यात तीन रंग प्रामुख्याने आहेत. भारतीय ध्वज संहितेनुसार, भारतीय ध्वजाची रुंदी:उंची गुणोत्तर 3:2 आहे. ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, आणि पावित्र्याचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता आणि कालचक्राचे त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे आणइ भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असा बोध या अशोकचक्रातून होतो.
कायद्याने, हा ध्वज खादीपासून बनवावा आणि खास प्रकारचे हात सूत कापडाचा किंवा रेशीमचा असावा.यासाठी महात्मा गांधी यांनी लोकप्रिय केलेली खादी वापरली जाते.ध्वज निर्मितीची प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये भारतीय मानक कार्यालयद्वारे ठरवली जाते. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाकडे आहे. तो अधिकार विभागीय गटांना वाटून दिला जातो. 2009 पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होती.
ध्वजाचा वापर भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हांशी संबंधित इतर कायद्यांद्वारे नियंत्रित केला जातो. मूळ संहितेमध्ये स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय दिवसांशिवाय खाजगी नागरिकांकडून ध्वज वापरण्यास सक्त मनाई आहे.
महत्वाच्या बातम्या :