(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Language : देशातील 'या' ठिकाणी बोलल्या जातात तब्बल 107 भाषा
Language : सन 2011 सालच्या जनगणनेचं विश्लेषण करुन दोन विश्लेषकांनी देशातील कोणत्या ठिकाणी किती भाषा बोलल्या जातात याचं विश्लेषण केलं आहे.
बंगळुरु : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात जेवढ्या जाती, धर्म, वंश, प्रांत आहेत त्याहून कित्येक पटीने अधिक भाषा बोलल्या जातात. प्रत्येक बारा मैलावर भाषेचा ढब बदलतो असं म्हटलं जातं. पण कर्नाटकातील बंगळुरु जिल्ह्यामध्ये तब्बल 107 भाषा बोलल्या जातात हे सांगितलं तर कुणाला पटेल का? ही गोष्ट खरी आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर बंगळुरु शहर आणि जिल्ह्यामध्ये 107 भाषा बोलल्या जात असल्याचं समोर आलं आहे.
बंगळुरुमध्ये बोलल्या जाणाऱ्या 107 भाषांमध्ये 22 अनुसूचित आणि 84 गैर अनुसूचित भाषांचा समावेश आहे. ब्रुकिंग इन्स्टिट्यूशनच्या सिनियर फेलो शमिका रवी आणि भारतीय सांख्यिकी संस्थेचे अर्थशास्त्र विभागाचे प्रोफेसर मुदित कपूर यांनी हे विश्लेषण केलं आहे.
बंगळुरात 44 टक्के लोक बोलतात कन्नड भाषा
बंगळुरात एकूण 44 टक्के लोक हे कन्नड भाषा बोलतात. त्यानंतर 15 टक्के लोक हे तामिळ भाषा, 14 टक्के लोक हे तेलुगु तर 6 टक्के लोक हे हिंदी भाषा बोलतात. बंगळुरुमध्ये देशातील विविध राज्यातून लोक रोजगारासाठी येतात.
नागालँडमधील दीमापूर या ठिकाणी 103 भाषा बोलल्या जातात तर आसाममध्ये 101 भाषांचा वापर केला जातो. तर पद्दुचेरी, बिहारचे कैंमुर, उत्तर प्रदेशातील कोशाम्बी, कानपूर आणि तामिळनाडूतील अरियालूर या ठिकाणी सर्वात कमी भाषा बोलल्या जातात. या ठिकाणी 20 पेक्षा कमी भाषा बोलल्या जातात.
वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र राहत असतील तर त्या ठिकाणच्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळते. इतर ठिकाणापेक्षा या ठिकाणी रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतात, त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते. विश्लेषकांनी असा दावा केला आहे की अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये 600 हून अधिक भाषा बोलल्या जातात.
महत्वाच्या बातम्या :