एक्स्प्लोर

Anil Deshmukh : Iphone 12 Pro च्या बदल्यात लीक केली सीबीआयची गोपनीय माहिती, अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

Anil Deshmukh : प्राथमिक चौकशीचा अहवाल लीक करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्याला Iphone 12 Pro ची लाच दिल्याची नोंद CBI ने आपल्या FIR मध्ये केली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत.

मुंबई : अनिल देशमुखांनीच सीबीआयचा प्राथमिक तपास अहवाल लीक केल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवाल लीक करण्यासाठी सीबीआयच्या सब इन्पेक्टरला आयफोन 12 ची लाच दिली गेली असल्याचं सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये सांगितलं आहे. देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी सीबीआयचे सब इन्पेक्टर अभिषेक तिवारी यांना गिफ्ट दिल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे अनिल देशमुखांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या प्राथमिक चौकशीचा एक अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुखांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नाही. तसेच सचिन वाझेंना पुन्हा नोकरीमध्ये घेण्याच्या प्रकरणातही अनिल देशमुखांनी कोणताही हस्तक्षेप केल्याचं समोर येत नाही. एकूणच सीबीआयच्या या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुखांना क्लीन चिट देण्यात आली होती. 

हा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सीबीआयवर टीकेची झोड उडवण्यात आली होती. जर अनिल देशमुखांचा या प्रकरणात काही हात नसेल तर मग त्यांच्यावर एफआयआर का दाखल करण्यात आला असा सवालही विचारला जात होता. 

या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सीबीआयने एक अंतर्गत चौकशी समिती नेमली. या समितीने तपास केल्यानंतर सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनीच हा अहवाल लीक केल्याचं समोर आलं. अनिल देशमुखांचे वकील आनंद डागा यांनी तिवारी यांना आयफोन 12 प्रो गिफ्ट दिल्याचं तपासात उघडकीस आलं. त्यानंतर आनंद डागा आणि अभिषेक तिवारी या दोघांनाही सीबीआयने ताब्यात घेतलं.  

अनिल देशमुखांची चौकशी सुरु असताना सीबीआयचा एक कर्मचारी नागपुरातील वकील आनंद डागा यांच्या संपर्कात आला आणि नंतर त्यांचा संपर्क वाढल्याचं सीबीआयच्या तपासात स्पष्ट झालं. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून 100 कोटी रुपये वसुली केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने या प्रकरणी अनिल देशमुखांच्या विरोधात काही पुरावे मिळाल्यानंतर एफआयआर दाखल केला होता.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar:Sanjay Raut काँग्रेसचा पाळलेला कुत्रा,डोम्या नाग; संतोष बांगरांची सडकून टीकाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 15 March 2025Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02PM TOP Headlines 02 PM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
चुकीचा निर्णय दिलाय, न्यायाधीशांवर RSS चा दबाव आला का? कोकाटेंविरोधात माजी न्यायाधीशांचा जोरदार हल्लाबोल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
घोडाझरी तलावावर गेलेल्या 5 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
खोक्याची कार जप्त, मग कोरटकरची Rolls Royce का जप्त केली नाही; ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
Embed widget