एक्स्प्लोर

Raju Shetty : समझोता पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनं ठरवायचं: राजू शेट्टी

Raju Shetty : 'करेक्ट कार्यक्रमा'च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशारा राजू शेट्टींनी राष्ट्रवादीला दिला आहे. 

सांगली : विधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानीला देणं ही काही कोणाची दया नाही, तो स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीमध्ये झालेला समझोता आहे. आता केलेला समझोता पाळायचा की पाठीत पुन्हा धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनं ठरवायचं असं राजू शेट्टी म्हणाले. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशाराही राजू शेट्टींनी राष्ट्रवादीला दिला. मी एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही, जलसमाधी आंदोलन होणार असंही ते म्हणाले. 

पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या या पदयात्रेच्या चौथ्या दिवशी देखील राज्य सरकारकडून कोणताही निर्णय नाही. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर सरकारला महागात पडेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, जिथं महाविकास आघाडी सरकार चुकतंय तिथे मी सरकारविरोधात ठामपणाने बोलणार. पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, मी पॅकेज देणारा माणूस नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण, पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाली नाही असा राज्य सरकारला घरचा आहेर राजू शेट्टींनी या आधीच दिला होता. 

जयंत पाटलांनी शेट्टींचा पत्ता कट केल्याची चर्चा
गेल्या दहा महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्ता कट केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात काढलेले मोर्चे आणि आंदोलन याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. या काळात राजू शेट्टी यांनी अनेकदा राज्य सरकारवर टीका केली. विशेषत: राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर त्यांनी टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर पहायला मिळतोय. 

आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. हे नाव महाविकास आघाडीने वगळलं की त्यांचा करेक्ट कार्यक्रम जयंत पाटलांनी केला हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध राजू शेट्टी असं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
Ratan Tata Death: उद्योगपती असूनही लोकांचा लाडका, रतन टाटांविषयी लोकांच्या मनात इतका आदर का?
उद्योगपती असूनही लोकांचा लाडका, रतन टाटांविषयी लोकांच्या मनात इतका आदर का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anath Nathe Ambe:अनाथनाथे अंबे: ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा महागौरीचा 10 Oct 2024Shantanu Naydu -Ratan Tata : रतन टाटांच्या निधनाने मित्र शांतनू नायडू भावूकRatan Tata Passed Away Cabinet : रतन टाटांना भारत रत्न द्या; राज्य मंत्रिमंळाची केंद्राला विनंतीABP Majha Headlines :  1 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
Ratan Tata Death: उद्योगपती असूनही लोकांचा लाडका, रतन टाटांविषयी लोकांच्या मनात इतका आदर का?
उद्योगपती असूनही लोकांचा लाडका, रतन टाटांविषयी लोकांच्या मनात इतका आदर का?
Ratan Tata: रतन टाटांना महाराष्ट्र सरकारची अनोखी सलामी, 'भारतरत्न'साठी शिंदे सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला!
रतन टाटांना महाराष्ट्र सरकारची अनोखी सलामी, 'भारतरत्न'साठी शिंदे सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला!
Cidco : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलत धनाढ्य बिल्डरांसाठी सिडकोची लॉटरी? माहिती मिळताच शेतकरी आक्रमक, शिरसाट म्हणाले...
सिडकोच्या संभाव्य लॉटरीला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध, आंदोलनाचा इशारा, लॉटरी निघणार नाही, संजय शिरसाट यांची भूमिका
Pakistan Media Over Death of Ratan Tata : जगाच्या पाठीवरून रतन टाटांच्या कार्याला सलाम, शेजारच्या पाकिस्तानमध्ये कोणती प्रतिक्रिया उमटली?
जगाच्या पाठीवरून रतन टाटांच्या कार्याला सलाम, शेजारच्या पाकिस्तानमध्ये कोणती प्रतिक्रिया उमटली?
Ratan Tata: अंबानींच्या अँटिलियापेक्षा भारी असलेल्या राजवाड्यासारख्या 'बख्तावर' मध्ये राहायचे रतन टाटा; जाणून घ्या कसं आहे?
अंबानींच्या अँटिलियापेक्षा भारी असलेल्या राजवाड्यासारख्या 'बख्तावर' मध्ये राहायचे रतन टाटा; जाणून घ्या कसं आहे?
Embed widget