एक्स्प्लोर

Ganesh Utsav 2021: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येताय? तर ही नवी नियमावली वाचाच

रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri) येणाऱ्या गणेशभक्तांसाठी (Ganesh Utsav) महत्वाची बातमी आहे. जिल्हा प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी (Konkan Ratnagiri Ganesh Utsav 2021) येणाऱ्या गणेश भक्तांसाठी आणि चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी न करता ती थेट गावातच केली जाणार आहे. त्याकरता नवीन नियमावली जाहीर केली असून रेल्वे प्रशासन, एस टी विभाग आणि गुगल फॉर्मच्या मदतीने गावामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची आणि भाविकांची माहिती गोळा केली जाणार आहे.

गावात आलेल्या प्रत्येक चाकरमान्यांची प्राथमिक तपासणी ही आशा वर्करच्या मार्फत केली जाईल. त्यानंतर तपासणीअंती कोणतीही कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास अँटीजेन किंवा RTPCR चाचणी केली जाईल. याबाबतचा सर्व सूचना ग्रामकृती दल, सरपंच पोलिस पाटील यांना देण्यात आल्या असून सहकार्य न करणाऱ्या व्यक्तीवर पॉलिसी कारवाई केली जाईल. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने याबाबतची नवीन नियमावली काल रात्री जाहीर केली असून नव्या नियमावलीबाबत मात्र सर्वसामान्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.

कोकण असेल किंवा रत्नागिरी जिल्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे संभाव्य कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेता यापूर्वी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी दोन डोस पूर्ण होणे किंवा 72 तासांपूर्वीचा rtpcr रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला होता. पण आता मात्र थेट गावात आल्यानंतरच गणेश भक्त किंवा चाकरमान्यांची कोरोना चाचणी होणार आहे.

दरम्यान याबाबत नियोजन पूर्णपणे योग्यरितीने झालं असून ग्राम कृतीदल, आशा वर्कर, पोलीस पाटील, सरपंच त्यांच्या बाबत चर्चा झाली असून त्यांच्याकडून देखील याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय नागरिकांची देखील जबाबदारीच आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान नवीन नियमावली पाहता प्रत्यक्षात या सर्व गोष्टींची अंमलबजावणी शक्य आहे का? आगामी निवडणुका आणि यापूर्वी व्यक्त केली गेलेली नाराजी या सर्व राजकीय दबावापोटी  शा प्रकारचे निर्णय तर घेतले गेले नाहीत ना? शिवाय, नवीन नियमावलीमुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर मिळणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल, एकाच वेबसाईटवर पासबूकची माहिती उपलब्ध होणार , Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल,Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल, एकाच वेबसाईटवर पासबूकची माहिती उपलब्ध होणार , Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल,Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
Jan Dhan account KYC : जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  
जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  
Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक,  ई केवायसी कशी पूर्ण करायची? जाणून घ्या प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक, ई केवायसी कशी पूर्ण करायची?
वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं; खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे
वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं; खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे
Ajit Pawar: पक्षाला वेळ द्यावा लागेल, मी कोण काम करतं याची नोंद घेतलीय; अजितदादांचा आपल्याच मंत्र्यांना सूचक इशारा
पक्षाला वेळ द्यावा लागेल, मी कोण काम करतं याची नोंद घेतलीय; अजितदादांचा आपल्याच मंत्र्यांना सूचक इशारा
Embed widget