India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत 38,353 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 140 दिवसांनी देशाच्या सक्रिय रुग्णसंख्येत घट
India Coronavirus Updates : देशात गेल्या 24 तासांत 38,353 नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर 497 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
India Coronavirus Updates : एका दिवसाची घट झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. बुधवारी आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 38,353 नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर 497 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशभरात गेल्या 24 तासांत 40013 कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,86,351 इतकी आहे. जी गेल्या 140 दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.45 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोना संसर्गाची एकूण आकडेवारी
महामारीच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत एकूण तीन कोटी 20 लाख 36 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापौकी 4 लाख 29 हजार 197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाबा म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 20 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून आता चार लाखांहून कमी झाली आहे. सध्या 3 लाख 86 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशातील सध्याची कोरोनास्थिती :
कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 20 लाख 36 हजार, 511
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 12 लाख 20 हजार 981
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 86 हजार 351
एकूण मृत्यू : चार लाख 29 हजार 179
लसीकरणाची एकूण आकडेवारी : 51 कोटी 90 लाख लसींचे डोस
केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद
केरळमध्ये मंगळवारी कोरोनाची लागण झालेल्या 21,119 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढून 35,86,693 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 18004 वर पोहोचली आहे.
राज्यात काल (बुधवार) 5,609 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल (बुधवार) 5,609 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 59 हजार 676 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.8टक्के आहे.
राज्यात काल (बुधवार) 137 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 30 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 66 हजार 123 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (4), धुळे (0), हिंगोली (78), नांदेड (52), अमरावती (76), अकोला (34), वाशिम (18), बुलढाणा (60), यवतमाळ (10), वर्धा (11), भंडारा (1), गोंदिया (2), चंद्रपूर (73), गडचिरोली (26) या नऊ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 892 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मालेगाव, धुळ्यात, नंदूरबार, परभणी, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक 782 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 99,05, 096 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,63, 442 (12.75 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,13,437 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.