एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Infantry Day : भारतीय लष्कराचं ऐतिहासिक पाऊल! आज 'श्रीनगर लँडिंग' साजरं करणार, काय आहे खास 

आज 27 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्कर (Indian Army) ऐतिहासिक 'श्रीनगर लँडिंग' (Srinagar landing) साजरं करणार आहे. दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्कर 'इन्फंट्री दिन' (Infantry Day) म्हणून साजरा केला जातो.

Jammu & Kashmir : 27 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्कर (Indian Army) ऐतिहासिक 'श्रीनगर लँडिंग' (Srinagar landing) साजरं करणार आहे. 1947 मध्ये या दिवशी भारतीय लष्कराने श्रीनगरमध्ये उतरून पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेक्यांच्या तावडीतून काश्मीरला (Kashmir Issue) मुक्त केले होते. म्हणूनच दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्कर 'इन्फंट्री दिन' (Infantry Day) म्हणून साजरा केला जातो. विशेष गोष्ट म्हणजे या वर्षी, या दिवशी म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान 'काश्मीर ब्लॅक डे' (kashmir black day)साजरा करण्याची योजना आखत आहे.

यंदा भारतीय लष्कराकडून श्रीनगर विमानतळावर 'इन्फंट्री दिन'च साजरा तर करणार आहेच सोबतच स्काय जंप, हेलिकॉप्टर ऑपरेशन आणि मिग -21 लढाऊ विमानांचे फ्लाय पास्ट देखील होणार आहे.

माहितीनुसार, भारतीय स्वातंत्र्यानंतर लगेचच पाकिस्तानने काश्मीरवर कब्जा करण्याच्या उद्देशाने मोठा हल्ला केला होता. हा हल्ला मुझफ्फराबाद (आता पीओके), उरी, बारामुल्ला, पुंछ आणि नौसेरा सेक्टरमध्ये करण्यात आला होता. या हल्ल्यानंतरच जम्मू-काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी भारतात प्रवेश करण्याचा करार केला आणि भारताची मदत मागितली होती. त्यानंतरच भारतीय लष्कराची शीख रेजिमेंट हवाई दलाच्या विमानाने श्रीनगर विमानतळावर (त्यावेळी बडगाम) उतरली. पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेक्यांच्या हल्ल्यापासून लष्कराने प्रथम हे विमानतळ सुरक्षित केले होते. यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याला सर्व भागातून मुजफ्फराबादकडे पळवून लावले होते, यामुळं संपूर्ण जम्मू-काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासून वाचले होते. म्हणूनच दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्कर 'इन्फंट्री दिन' म्हणून साजरा करते.

यंदा पाकिस्तान 27 ऑक्टोबरला 'काश्मीर ब्लॅक डे' साजरा करणार आहे. यासाठी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने स्वतंत्र निधी देखील दिला आहे. सुमारे एक हजार डॉलर्सचा हा निधी देश-विदेशात राहणाऱ्या पाकिस्तानच्या समर्थकांना देण्यात येणार आहे, जेणेकरून सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅक डेचा प्रचार  प्रसार करता यावा.  याशिवाय पाकिस्तानने आपल्या सर्व दूतावासांना, उच्चायुक्तांना आणि विदेशातील मिशनला 'काश्मीर ब्लॅक डे' करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय त्यांच्या देशाच्या संसद सदस्यांच्या समितीला 25 ऑक्टोबर रोजी 'काश्मीर ब्लॅक डे' साजरा करण्यासाठी देशात आणि परदेशात होणाऱ्या कार्यक्रमांची आणि प्रयत्नांची माहिती देणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget