एक्स्प्लोर
Advertisement
Independence Day 2022 : 76 व्या स्वातंत्र्य दिनाबाबत 10 महत्त्वाच्या गोष्टी, वाचा सविस्तर...
Independence Day 2022 : आज 15 ऑगस्ट 2022, यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या...
Independence Day 2022 : भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा येत आहे. आज 15 ऑगस्ट 2022, यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. पंतप्रधान मोदी यांनी नवव्यांदा ध्वजारोहण केलं आहे. यानंतर त्यांनी देशातील जनतेला संबोधित करत देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या दिल्या.
- यंदा पहिल्यांदाच 21 तोफांच्या सलामीमध्ये स्वदेशी बनावटीच्या तोफा 'अटॅग' (ATAGS) वापरण्यात आल्या आहेत. DRDO म्हणजेच भारतीय संरक्षण संशोधन संस्थेने विकसित केलेली Advanced Towed Artillery Gun System (ATAGS) या 'मेक इन इंडिया' मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आल्या आहेत.
- एनसीसी (NCC) अर्थात राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सच्या विशेष युवा विनिमय कार्यक्रमाचा भाग म्हणून 14 वेगवेगळ्या देशांतील 26 अधिकारी आणि 127 कॅडेट यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सहभागी झाले.
- राजधानी दिल्लीमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत लाल किल्ल्यावर 10,000 हून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत.
- लाल किल्ल्याच्या एंट्री पॉइंटवर फेशियल रेकग्निशन सिस्टीम कॅमेरे बसवण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे 7,000 निमंत्रितांनी हजेरी लावली.
- यावर्षी लाल किल्ल्याच्या भिंतींवर विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांचे भिंतीवर फोटो तसेच विविध राज्यांमधील सांस्कृतिक, नैसर्गिक आणि धार्मिक वारसा दर्शविणारी सजावट करण्यात आली आहे.
- देशात मार्च 2021 पासून 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमाद्वारे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याचा उत्सव साजरा केला जात आहेत.
- यंदा केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात आलं आहे. या अंतर्गत देशातील जनतेला 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
- देशभरात राष्ट्रीय स्मारके आणि शासकीय इमारती राष्ट्रध्वजाप्रमाणे तिरंगी रंगात न्हाऊन निघाल्या आहेत.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी संध्याकाळी राष्ट्राला संबोधित करताना सांगितलं की, '2047 सालापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करू शकू. बाबासाहेबांच्या नेतृत्वात आपण त्यांच्या व्हिजनला एक ठोस आकार दिला असेल. भीमराव आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा तयार केला.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
भविष्य
आरोग्य
Advertisement