एक्स्प्लोर

Fatty Lever: फॅटी लिव्हर आणि टाईप-2 मधुमेह आजारात संबंध; आयआयटी मंडीचे महत्त्वाचे संशोधन

Fatty Lever And Type 2 Diabetic :  फॅटी लिव्हर आणि मधुमेह टाईप-2 आजाराच्या संबंधाबाबत आयआयटी मंडीने महत्त्वाचे संशोधन केले आहे.

Fatty Lever And Type 2 Diabetic :  फॅटी लिव्हर (Fatty Lever) आणि टाईप- 2 मधुमेहाच्या (Type 2 Diabetic) आजारात एक जैवरासायनिक (Biochemical) संबंध असल्याचे समोर आले आहे. मंडी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या (IIT Mandi) संशोधकांच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. या संशोधनामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (NAFLD) आजार असलेल्या लोकांच्या उपचारासाठी मोठी मदत होणार असल्याचे संशोधकांनी म्हटले. 

भारतासाठी हे संशोधन अतिशय महत्त्वाचे असल्याचे समजले जात आहे. भारतात NAFLD आजाराचे ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार, जवळपास 40 टक्के प्रौढांना NAFLD च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. NAFLD हे टाईप-2 मधुमेहाशी संबंधित आहे. भारतातील जवळपास 50 दशलक्ष प्रौढांना हे दोन्ही आजार आहेत. 

आयआयटी-मंडीचे निष्कर्ष डायबिटीज या जर्नलमध्ये प्रकाशित  करण्यात आले आहेत. आयआयटी मंडीतील स्कूल ऑफ बायोसायन्सेस अँड बायोइंजिनियरिंगचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रसेनजित मंडल यांच्यासह सुरभी डोगरा, प्रिया रावत, पी. विनिथ डॅनियल आणि  CSIR-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजीचे डॉ. पार्थ चक्रवती, सुजय मैती, अविषेक पौल, डॉ. कौशिक दास आणि IPGMER आणि SSKM हॉस्पिटलचे डॉ. सौविक मित्रा यांनी हे रिसर्च पेपर लिहिला आहे. 

डॉ. प्रसेनजित मंडल यांनी सांगितले की, NAFLD  हे इन्सुलिन प्रतिरोध आणि T2DM चे एक स्वतंत्र प्रेडिक्टर आहे. NAFLD  हे इन्शुलिन करणाऱ्या पॅनक्रियाटिक β-सेलवर कसा परिणाम करतात हे समोर आले नाही.  β-सेल निकामी, निष्क्रिय होणे आणि कार्बोहायड्रेट्सपासून लिव्हर फॅट तयार होणे, यातील संबंधाबाबतचे संशोधन करणे हे उद्दिष्ट्य होते, असे त्यांनी सांगितले. 

संशोधनात चरबीयुक्त उंदीर आणि मानवी NAFLD रूग्णांकडून काढलेल्या रक्त नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. दोन्ही नमुन्यांमध्ये S100A6 नावाचे कॅल्शियम-बाइंडिंग प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. हे  प्रोटीन फॅटी लिव्हरमधून सोडले जाते. हे प्रोटीन लिव्हर आणि स्वादुपिंडमध्ये दुवा साधण्याचे काम करते. 

S100A6 β-पेशींच्या इन्सुलिन स्राव क्षमतेवर विपरित परिणाम करते. त्यामुळे T2DM च्या प्रमाणात वाढ होते. जैवरासायनिक स्तरावर, S100A6 स्वादुपिंडाच्या बीटा पेशींवर  Advanced Glycation End product (RAGE)  रिसेप्टर सक्रिय करून इन्सुलिन स्राव रोखत असल्याचे आढळले.

आयआयटी मंडीच्या सुरभी डोगरा यांनी सांगितले की, S100A6 कमी झाल्यामुळे इन्सुलिन स्राव आणि उंदरांमध्ये रक्तातील ग्लुकोजचे नियमन सुधारले असल्याचे दिसून आल्याचे संशोधनात आढळले. 

आयआयटी मंडीच्या संशोधकांनी केलेले संशोधन अनेक अर्थांनी महत्त्वाचे असल्याचे म्हटले जाते. फॅटी लिव्हरमधील   S100A6 स्रावशी संबंधित असलेला molecular and cellular प्रक्रिया ही β-सेल इन्सुलिनवर परिणाम करते. रक्तातील S100A6 ची वाढलेली पातळी NAFLD रूग्णांमध्ये T2DM चा धोका ओळखण्यासाठी होऊ शकतो. 

रक्तामधून S100A6 प्रसारित केल्याने β-सेलचे कार्य उत्तमपणे सुरू राहू शकते. त्याशिवाय, जैवरासायनिक मार्ग ज्याद्वारे S100A6 कार्य करते हे समोर आले आहे. RAGE antagonistic molecules चा वापर करून NAFLD रुग्णांमध्ये β-सेलचे कार्य पुन्हा सुरू करता येऊ शकते.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget