एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मी कर्ज भरायला तयार, मात्र व्याज विसरा : विजय मल्ल्या

आपण 100 टक्के कर्ज फेडायला तयार आहे, अशा आशयाचा ट्वीट करुन विजय मल्ल्या यांनी फक्त कर्जाच्या मुद्दलच परतफेड करु शकतो, मात्र व्याजाची रक्कम देऊ शकणार नाही, असं स्पष्ट केलंय. मद्यसम्राट विजय माल्ल्या यांनी आज एका पाठोपाठ चार ट्वीट करुन भारतीय बँकांसमोर कर्जफेडीचा नवा प्रस्ताव सादर केला

नवी दिल्ली : भारतीय बँकाचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याने कर्ज फेडण्यासंदर्भात बँकांसमोर नवीन प्रस्ताव ठेवला आहे.आपण 100 टक्के कर्ज फेडायला तयार आहे, अशा आशयाचा ट्वीट करुन विजय मल्ल्या यांनी फक्त कर्जाच्या मुद्दलच परतफेड करु शकतो, मात्र व्याजाची रक्कम देऊ शकणार नाही, असं स्पष्ट केलंय. मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी आज एका पाठोपाठ चार ट्वीट करुन भारतीय बँकांसमोर कर्जफेडीचा नवा प्रस्ताव सादर केला आहे. मागील तीन दशकांपासून किंगफिशरसारखी मोठी मद्य कंपनी भारतात व्यवसाय करत होती. त्यातून भारत सरकारला कोट्यावधी रुपयांच्या कराचा लाभ झाला. तसेच किंगफिशर एअरलाईन्स प्रवाश्यांच्या सेवेत होती. मात्र ती बुडाली. तरीही मी कर्ज फेडायला तयार आहे, माझा प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंती विजय मल्ल्याने ट्वीटरद्वारे केली आहे. तेलाच्या वाढत्या दरामुळे किंगफिशर एअरलाईन्स बुडाली किंगफिशर एक शानदार विमान वाहतूक कंपनी होती. मात्र त्यावेळी कच्च्या तेलाचे भाव 140 डॉलर प्रतिबॅरल पर्यंत पोहोचले. त्यामुळे एअरलाईन्सला तोटा सहन करावा लागला. या वाढत्या इंधनाच्या किंमतीतच बँकांनी दिलेलं भांडवल जिरलं, म्हणून किंगफिशर एअरलाईन्स बंद करावी लागली, असंही मल्ल्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केलंय. माध्यम आणि नेत्यांवर सुड विजय मल्ल्या यांनी भारतीय प्रसार माध्यमे आणि राजकीय नेत्यांवरही आपल्या ट्वीटमधून टीका केलीय. "मी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं कर्ज बुडवून पळून गेलो, अशी प्रतिमा माध्यमे आणि राजकारण्यांनी तयार केली. मात्र हे पूर्णपणे खोटं आहे. मी कर्नाटक उच्च न्यायालयात सर्वसमावेशक तडजोडीचा प्रस्ताव दाखल केला होता, त्यावेळी कोणी काही बोलले नाही. असं सांगून विजय मल्ल्या यांनी त्यांच्यासोबत दुजाभाव झाल्याचा आरोप केला. 10 डिसेंबरला सुनावणी मल्ल्या प्रकरणावर लंडनच्या वेस्टमिंस्टर कोर्टात 10 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्याला याप्रकरणी भारतात आणल जाऊ शकत. हे प्रकरण अंगलट येत असल्याचं दिसताच त्याने हा नवीन प्रस्ताव ठेवला आहे. आता या प्रस्तावाला बँका मान्य करतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
Embed widget