एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccination Certificate : कोरोना लसीकरण प्रमाणपत्रात माहिती चुकलीय, घरबसल्या करा बदल
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला केवळ एक संधी मिळेल. तुम्ही पुन्हा चुकीचे तपशील भरले तर मात्र त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही.
मुंबई : कोरोना लसीकरणानंतर मिळालेल्या सर्टिफिकेटवर जर आपले नाव, पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची असेल तर काळजी करु नका. कारण तुम्ही त्यात बदल कर शकता. Cowin वेबसाईट आपल्याला यामध्ये सुधारणा करण्यास परवानगी मिळते. आपण घरी बसून त्यात सुधारणा करू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्टिफिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला केवळ एक संधी मिळेल. तुम्ही पुन्हा चुकीचे तपशील भरले तर मात्र त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही. आता कोरोना लसीकरण सर्टिफिकेटमध्ये सुधारित करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया काय आहे जाणून घेऊया.
लसीकरण प्रमाणपत्रात दुरुस्त्या कशा कराल?
- यासाठी सर्वात आधी www.cowin.gov.in वेबसाईटवर जा. यानंतर रजिस्टर आणि साईन बटणावर क्लिक करा.
- आता आपल्या नोंदणीकृत फोनवर ओटीपी येईल.
- अकाउंट डिटेल्स सेक्शनमध्ये Raise an issie वर क्लिक करा.
- आता येथे आपण नोंदणीकृत सदस्याचे नाव भरावे लागेल, जे अनिवार्य आहे.
- यानंतर सर्टिफिकेट करेक्शनच्या पर्यायावर क्लिक करा आणि Continue वर क्लिक करा.
- आता तुम्हाला ज्या काही दुरुस्त्या करायच्या आहेत त्या अचूकपणे करा आणि रजिस्टर रिक्वेस्टसाठी Continue बटणावर क्लिक करा.
- नवीन अपडेटेड सर्टिफिकेट तुम्ही डाऊनलोड करुन सेव्ह करु शकता.
पासपोर्टला कोरोना लसीकरण सर्टिफिकेटशी लिंक करा
- पासपोर्टला कोरोना लसीकरण सर्टिफिकेटशी लिंक करण्यासाठी cowin.gov.in वेबसाइटवर जा.
- येथे लॉग इन करा आणि raise an issue पर्याय निवडा.
- यानंतर तेथे पासपोर्टचा पर्याय निवडा.
- येथे ड्रॉप डाऊन मेन्यूमधील व्यक्ती निवडा.
- यानंतर पासपोर्ट क्रमांक एंटर करा.
- आता शेवटी सर्व तपशील भरुन सबमिट करा.
- असं केल्यानंतर काही वेळात तुमचा पासपोर्ट आणि कोरोना लसीकरण सर्टिफिकेट लिंक होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement