एक्स्प्लोर
दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरकडून स्टाफचा विनयभंग
गैरवर्तनाची तक्रार करणाऱ्या महिला स्टाफलाच नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. त्याचप्रमाणे तिला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करुन देणाऱ्या कर्मचाऱ्यालाही कामावरुन कमी करण्यात आलं.
![दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरकडून स्टाफचा विनयभंग Hotel Security Manager Arrested For Molesting Woman Employee Latest Update दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरकडून स्टाफचा विनयभंग](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/18233923/Delhi-five-star-hotel-molestation.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत चक्क एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेसोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने महिला स्टाफचा पदर खेचतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
दिल्ली विमानतळाजवळ एयरोसिटी नावाच्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने स्टाफचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पवन दहिया असं आरोपीचं नाव असून गेस्ट रिलेशन विभागात काम करणाऱ्या महिलेचा पदर आरोपी खेचत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गैरवर्तनाची तक्रार करणाऱ्या महिला स्टाफलाच नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. त्याचप्रमाणे तिला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करुन देणाऱ्या कर्मचाऱ्यालाही कामावरुन कमी करण्यात आलं.
33 वर्षीय तक्रारदार महिला गेल्या दोन वर्षांपासून हॉटेलमध्ये नोकरी करते. गेल्या काही महिन्यांपासून सिक्युरिटी मॅनेजर आपल्याला शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी करत असल्याचा आरोप तिने केला आहे.
29 जुलै रोजी तिचा वाढदिवस होता. त्यावेळी पवनने महिलेला आपल्या खोलीत बोलावलं. क्रेडिट कार्ड काढून तिला हव्या तितक्या किमतीचं गिफ्ट घेण्यास सांगितलं. त्याचप्रमाणे हॉटेलमधल्या एका रुममध्ये राहण्याची गळ घातली. इतकंच नाही तर तिचा पदर खेचायला सुरुवात केली. त्यानंतर संधी साधून तिने रुममधून पळ काढला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)