एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोलिसांना गुंगारा देणारी हनीप्रीत नेपाळमध्ये दिसली : सूत्र
राम रहीमच्या सर्वात जवळची व्यक्ती समजली जाणारी हनीप्रीत ही नुकतीच नेपाळमध्ये दिसून आल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. मात्र, नेपाळ पोलिसांनी याला कोणताही दुजोरा दिलेला नाही.
काठमांडू : बलात्कारी बाबा राम रहीमच्या सर्वात जवळची समजली व्यक्ती हनीप्रीत इन्सा हिला नेपाळमध्ये पाहिल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. हनीप्रीत नेपाळच्या धरान-इटहरी परिसरात दिसून आली.
मात्र, नेपाळ पोलीस याला दुजोरा देण्यास तयार नाहीत. सुत्रांच्या माहितीनुसार, हनीप्रीतनं नेपाळच्या महेंद्रनगरमध्ये आली आणि नंतर ती नेपाळच्या पूर्वेकडील भागात गेली. हनीप्रीत सुनसरी-मोरग्ड जिल्ह्यात असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे.
दरम्यान, असं असलं तरी, हनीप्रीत नेपाळमध्ये नसल्याचा दावा नेपाळ पोलीस करत आहेत. मात्र, एकही पोलीस अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाही.
नेपाळमधील पोलीस अधिकारी प्रकाश आर्यल यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, 'या प्रकरणाबाबत भारताकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जरी हनीप्रीत नेपाळमध्ये असेल तरीही आम्ही तिला पकडू शकत नाही. कारण की, तिच्याविरोधात इथं कोणताही गुन्हा दाखल नाही.
हनीप्रीत खरंच नेपाळला पळून गेली?
दरम्यान, राम रहीमचा एक सहकारी प्रदीप गोयल याला उदयपूरमधून अटक करण्यात आली होती. त्याच्या माहितीनुसार, हनीप्रीत ही नेपाळला पळून गेली आहे. प्रदीपवर देखील पंचकुलामध्ये हिंसा पसरवल्याचा आरोप आहे.
राम रहीम शिक्षा झाल्याच्या तीन आठवड्यानंतरही हरियाणा पोलीस हनीप्रीतला शोधू शकलेले नाहीत.
त्यामुळे आता हनीप्रीत नेमकी आहे कुठे याबाबत हरियाणा पोलीस अजूनही अनभिज्ञच आहेत.
संबंधित बातम्या :
हनीप्रीतचा शोध सुरुच, बिहारमधील सात जिल्ह्यात अलर्ट जारी
हनीप्रीतच्या कुटुंबातील सदस्यही गायब
राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement