एक्स्प्लोर
दिल्लीतील हॉकीपटूची गोळी झाडून आत्महत्या
दिल्लीतील सरोजनी नगर परिसरात काल (मंगळवार) सकाळी 10 वाजेच्या दरम्यान रिझवान खान नावाच्या एका हॉकीपटूनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील सरोजनी नगर परिसरात काल (मंगळवार) सकाळी 10 वाजेच्या दरम्यान रिझवान खान नावाच्या एका हॉकीपटूनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांवरच त्यांनी हा आरोप केला आहे. सोमवारी रिझवाननं मैत्रिणीच्या घरी आपली बॅग, मोबाईल आणि दोन लाख रुपये ठेवले होते. यूपीच्या बुलंदशहरमध्ये राहणारा रिझवान जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात शिकत होता. तसंच तो राज्यस्तरीय हॉकीपटूही होता. रिझवानच्या मृत्यूनं त्याच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. दरम्यान, पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. ही आत्महत्या आहे की हत्या या अनुशंगाने देखील पोलीस तपास करत आहे.
आणखी वाचा























