एक्स्प्लोर
राम मंदिरासाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या
विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिरासाठी अयोध्येसह नागपुरातही हनुमान नगर परिसरात हुंकार रॅलीचं आयोजन केलं आहे. नागपुरातीस हनुमान नगर परिसरातल्या देशमुख कॉलेजात ही हुंकार रॅली होणार आहे. या हुंकार रॅलीत सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
![राम मंदिरासाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या Hindu organizations gathered together for Ram Mandir राम मंदिरासाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/25042406/unnamed-file.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अयोध्या : दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज दुसऱ्या दिवशी रामलल्लाचं दर्शन घेतलं. काही वेळातच ते अयोध्येतील पंचवटी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतील. तर राम मंदिराच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या असून देशभरात काही ठिकाणी हुंकार रॅलीचं तर काही ठिकाणी धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
नागपूरात हुंकार रॅलीचं आयोजन
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर राममंदिराच्या निर्मितीसाठी हिंदू संघटना आज एकवटल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिरासाठी अयोध्येसह नागपुरातही हनुमान नगर परिसरात हुंकार रॅलीचं आयोजन केलं आहे. नागपुरातीस हनुमान नगर परिसरातल्या देशमुख कॉलेजात ही हुंकार रॅली होणार आहे. या हुंकार रॅलीत सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि संघाच्या सहयोगी संघटनांनी या रॅलीचं आयोनज केलंय. 2019 च्या पूर्वी राम मंदिराच्या निर्मितीची मागणी या संघटनांनी केलीय.
अयोध्येत विहिंपची धर्मसभा
राम मंदिर बांधण्यासाठी सर्वच स्तरावरुन मागणी होत असतनाच विश्व हिंदू परिषदेने धर्मसभेचं आयोजन केलं आहे. या धर्मसभेसाठी देशभरातून तीन लाख रामभक्त येणार असल्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे. यात साधू संतासह विहिंप आणि भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. मात्र व्यासपीठावर फक्त साधू संत असतील. विहिंपची ही धर्मसभा साधारण चार तास चालणार आहे.
शंकराचार्यांची धर्मसभा
विहिंपच्या धर्मसभेसह काशीमध्ये आज शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वतींनी धर्मसभेचं आयोजन केलं आहे. या धर्मसभेत 1008 संत सामील होणार आहेत, अशी माहिती शंकराचार्यांनी दिली. धर्मसभेला आज सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार असून या धर्मसभेची सांगता 27 नोव्हेंबरला होणार आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
अयोध्येत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक अतिरिक्त पोलीस महासंचालक स्तराचे अधिकारी, एक पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 10 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 21 क्षेत्र अधिकारी, 160 पोलीस निरीक्षक, 700 कॉन्स्टेबल, तसेच पीएसीच्या 42 आणि आरएएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय एटीएसचे कमांडो आणि आकाशातून नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)