Gyanvapi Row : ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायधीशांना धमकीचं पत्र
Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिद परिसरातील व्हिडीओग्राफी करण्याचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी धमकीचं पत्र मिळालं आहे.
Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिद आणि परिसराच्या (Gyanvapi Masjid) सर्वेक्षणाचे आदेश देणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर (Ravi Kumar Diwakar) यांना मंगळवारी एक धमकीचं पत्र (Threatening Letter) मिळालं आहे. वाराणसी पोलीस आयुक्तांनी (Varanasi Police Commissioner) दिलेल्या माहितीनुसार, न्यायधीशांच्या सुरक्षेसाठी नऊ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सध्या यासंदर्भात तपास सुरु आहे.
वाराणसीचे दिवाणी न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांनी यासंदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त वाराणसी यांना पत्राद्वारे धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती दिली आहे. दिवाकर यांनी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, त्यांना हे पत्र ‘इस्लामिक आगाज़ मूवमेंट’कडून काशिफ अहमद सिद्दीकीनं पाठवलं आहे.
पोस्टाने पाठवलं धमकीचं पत्र
या प्रकरणी वाराणसीचे पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश यांनी सांगितलं की, न्यायाधीश दिवाकर यांना पोस्टानं एक धमकीचं पत्र मिळालं आहे. यामध्ये आणखी काही कागदपत्रे जोडून माहिती देण्यात आली आहे. वाराणसीचे पोलीस उपायुक्त वरुण यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी एकूण नऊ पोलीस तैनात करण्यात आले असून वेळोवेळी त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.
न्यायाधीशांना पाठवलेलं हे धमकीचं पत्र सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. या पत्रात लिहिलं आहे की, 'आता न्यायाधीशही भगव्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. हिंदू आणि त्यांच्या सर्व संघटनांना खूश करण्यासाठी हा निकाल दिला जात आहे. यानंतर फाळणी झालेल्या भारतातील मुस्लिमांवर आरोप केला जातो. तुम्ही न्यायालयीन काम करत आहात. तुम्हांला सरकारी यंत्रणेचं संरक्षण आहे. मग तुमची पत्नी आणि आई यांना कसलं भीती...? आजकाल न्यायिक अधिकारी परिस्थिती बघून फसवणूक करत आहेत. ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण ही एक सामान्य प्रक्रिया असल्याचं विधान तुम्ही केलं होतं. आता तुम्ही मशिदीला मंदिर घोषित कराल.'
मशिदीच्या परिसराची पाहणी करण्याचा न्यायाधीशांचा आदेश
न्यायाधीश दिवाकर यांच्या न्यायालयाने 26 एप्रिल रोजी ज्ञानवापी परिसराचे व्हिडीओग्राफी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या पाहणीचा अहवाल 19 मे रोजी न्यायालयात सादर करण्यात आला. सर्वेक्षणादरम्यान हिंदू संघटनांनी ज्ञानवापी मशिदीच्या वाजू खान्यात 'शिवलिंग' सापडल्याचा दावा केला. हा दावा मुस्लिम पक्षानं फेटाळुन लावत ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचं म्हटलं.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या बाजूच्या याचिकेवर हे प्रकरण जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले. मुस्लीम पक्षाने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता की, हा खटला प्रार्थनास्थळ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात असल्यामुळे यावर सुनावणी करणं योग्य नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- ज्ञानवापीचा आणखी एक Video समोर! नंदीपासून 83 फूट अंतरावर 'शिवलिंग', भिंतींवर त्रिशूळ, हत्तीच्या खुणा
- Mohan Bhagawat : मोहन भागवतांचे ज्ञानवापीबाबत मोठे वक्तव्य, 'प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहता?'
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.