एक्स्प्लोर

कंपोझिशन स्किममधील व्यावसायिकांना जीएसटी वसूल करता येणार नाही!

नवी दिल्ली : जे उद्योजक, व्यापारी, उत्पादक आणि हॉटेल मालक जीएसटीच्या कंपोझिशन स्किममध्ये येतात, त्यांना व्यवसायाच्या ठिकाणी ‘कंपोझिशन टॅक्सेबल पर्सन’ हा बोर्ड लावावा लागणार आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत आदेश दिला. कंपोझिशन स्किम छोट्या व्यापाऱ्यांसाठी आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल 20 लाखांपेक्षा अधिक, पण 75 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना या स्किममध्ये भाग घेता येईल. या योजनेनुसार व्यापाऱ्यांना 1 टक्का, उत्पादकांना 2 टक्के आणि रेस्टॉरंट मालकांना 5 टक्के कर एकरकमी देता येईल.  या योजनेतील व्यावसायिकांना इनपुट टॅक्स क्रेडिटचाही फायदा होणार नाही आणि ग्राहकांकडून जीएसटीही वसूल करता येणार नाही. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात व्यवसाय करणारे, जीएसटीतून सूट देण्यात आलेल्या वस्तूंची विक्री करणारे, आईस्क्रीम आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक या योजनेत सहभाग घेऊ शकत नाहीत. कंपोझिशन स्किममध्ये सहभागी होणाऱ्या व्यावसायिकांना वेगवेगळे कर वसूल करण्याची मुभा नसेल. जर एखाद्या हॉटेलमध्ये 100 रुपये बिल झालं तर केवळ 100 रुपयेच बिल द्यावं लागेल. त्या 100 रुपयांमध्येच सर्व प्रकारच्या करांचा समावेश असेल, अशी माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी दिली. एसी रेस्टॉरंटमध्ये 18 टक्के आणि नॉन एसी रेस्टॉरंटमध्ये 12 टक्के जीएसटी लागणार आहे. तर मद्यविक्री केली जाणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये (एसी किंवा नॉन एसी) खाद्यपदार्थांवर 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल. तर दारुवर व्हॅटही असेल. दरम्यान कंपोझिशन स्किम असणाऱ्यांकडे वस्तू स्वस्त होतील का, या प्रश्नाचं उत्तरही हसमुख अधिया यांनी दिलं. कंपोझिशन स्किममध्ये असणारे व्यावसायिक कच्चा माल किंवा इनपुट खरेदी करतील तेव्हा त्यांनाही इतरांप्रमाणेच जीएसटी द्यावा लागणार आहे. त्यांना जो कर द्यावा लागेल, तो त्यांच्या वस्तूंच्या किंमतींमध्ये समाविष्ट केला जाईल. मूळ किंमतीत नफ्याचा समावेश करुन त्यावर 1, 2 आणि 5 टक्के याप्रमाणे जीएसटी लावला जाईल. त्यामुळे कंपोझिशन स्किमधारकांकडे वस्तू स्वस्त मिळणार नाहीत, असंही हसमुख अधिया यांनी स्पष्ट केलं. कंपोझिशन स्किममधील व्यावसायिकांना तीन महिन्यांचा कर एकदाच भरावा लागेल. तर इतरांना दर महिन्याला कर भरावा लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget