Devendra Fadnavis : 82 हजार 299 कोटींची गुंतवणूक, 18 हजार 440 रोजगार, हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल, देवेंद्र फडणवीसांची माहिती
जल विद्युत निर्मितीसाठीच्या पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी करण्यात आलेले सामंजस्य करार हे हरित ऊर्जा क्षेत्रातलं मोठे पाऊल असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.
Devendra Fadnavis on Green Energy : जल विद्युत निर्मितीसाठीच्या पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी करण्यात आलेले सामंजस्य करार हे हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. फडणवीस यांच्या पुढाकाराने सह्याद्री अतिथीगृह येथे हरित ऊर्जा क्षेत्रातील चार कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या करारामध्ये 82 हजार 299 कोटी रुपयांची गुंतवणूक असून त्यामुळे 18 हजार 440 रोजगार निर्माण होणार आहेत.
2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्याचे धोरण
2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. सन 2030 पर्यंत 50 टक्के नवीकरणीय ऊर्जेचे उत्पादन करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल टाकले असून 47 हजार 500 कोटींच्या सामंजस्य करारामुळे 18 हजार 828 रोजगार निर्मिती होणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या करारामुळे 15 हजार 100 मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. यापूर्वीही राज्य शासनाने सौर ऊर्जा निर्मितीत लक्षणीय पुढाकार घेतला आहे. यापूर्वी 55 हजार 970 मेगावॉट वीज निर्मितीसाठी करार करण्यात आले आहेत. यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक आणि 90 हजार 390 इतकी रोजगार निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभाग आणि एसजेवीएन लिमिटेड, जेएसडब्लु एनर्जी लि. आणि मेघा इंजिनिअरिंग अॅण्ड इन्फ्रा लि. यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांच्यासह जलसंपदा विभाग व संबधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. पम्प्ड स्टोरेज सामंजस्य करारावर जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी आणि संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली.
प्रकल्पासाठी 3 हजार कोटींची गुंतवणूक होणार
आरईसीपीडीसीएल – आरईसी (RECPDCL – REC) पॉवर डेव्हलपमेंट आणि कन्सल्टन्सी लिमिटेड यांच्यासमवेत सामंजस्य करार केल्यामुळे मुख्यतः रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पांच्या विकासासाठी प्रकल्प/ पायाभूत सुविधा विकास आणि अभियांत्रिकी/ उत्पादनातील मुख्य शक्तींचा लाभ घेण्यासाठी एकत्र काम करणे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांचा विकास जो दोन्ही पक्षांसाठी व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य असेल. सुरुवातीला 500 मेगावॅटचा हायब्रीड प्रकल्प सुरु करणे, इक्विटी सहभाग प्रकल्पानुसार परस्पर सहमतीने ठरवणे, दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रकल्पांसाठी संयुक्त उपक्रम कंपनी स्थापन करणेबाबत विचार केला जाणार आहे. या सामंजस्य करारामुळे आरईसीपीडीसीएल सोबतच्या 500 मेगावॅट पुर्नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी 1 हजार 663 रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पासाठी रु. 3 हजार कोटी इतकी गुंतवणूक असणार आहे.
टीएचडीसीआयएल – टीएचडीसी (THDCIL – THDC) इंडिया लिमिटेड कंपनी समवेत झालेल्या सामंजस्य करारामुळे 4 हजार 250 मेगावॅट रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पांचा विकास करण्यात येणार आहे. 4 हजार 250 मेगावॅट पुर्नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांतून – 14 हजार 130 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात 29 हजार 329 कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे.
एचपीआरजीई – एचपीसीएल (HPRGE- HPCL) रिन्यूएबल आणि ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी समवेत झालेल्या सामंजस्य करारामुळे जीटीपीएस (GTPS), उरण येथे 50 केटीपीए (KTPA) ग्रीन हायड्रोजन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह प्लांटचा विकास करणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची निर्मिती, पायाभूत सुविधांची तैनाती, ग्रीन हायड्रोजन आणि त्याचे डेरिव्हेटिव्हसाठी निर्यात-आयात मार्ग तयार करणे, ग्रिड कनेक्टेड आणि/किंवा ऑफ-ग्रिड आरई आधारित पॉवर प्रकल्पांचा विकास आणि रिन्यूएबल एनर्जी पुरवण्यासाठी उपाय. एचपीसीएल आणि इतर ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 24 तास रिन्यूएबल एनजी पुरविण्यास मदत होणार आहे. यासाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रकल्पांसाठी संयुक्त उपक्रम कंपनी स्थापन करण्याचा विचार करत असून एचपीआरजीई (HPRGE) सोबतच्या 50 केटीपीए हरित हायड्रोजन प्रकल्पांच्या विकासासाठी 1 हजार 635 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पात 12 हजार कोटी इतकी गुंतवणूक असणार आहे.
महत्वाच्या बातम्या: