Manmohan Singh Corona Positive | माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे.
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज विक्रमी भर पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येने दरदिवशी दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून लसींचा तुटवडा, ऑक्सिजनचा पुरवठा कमी तसेच रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा, बेड्सची अपुरी संख्या अशा अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्शवभूमीवर काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले होते.
Former PM Manmohan Singh tests positive for COVID19, admitted to AIIMS Trauma Centre in Delhi: AIIMS Official
— ANI (@ANI) April 19, 2021
(file photo) pic.twitter.com/zZtbd6POWd
कोरोनाशी लढताना आपले लसीकरणाचे प्रयत्न वेगानं वाढवणे आवश्यक आहे. आपण किती लोकांना लस दिली हा आकडा बघणं थांबवून पूर्णपणे किती टक्के लोकसंख्या ला लस दिली यावर लक्ष केंद्रित करायला हवं, लसीकरणाच्या साठी किती ऑर्डर दिल्या गेले आहेत याची आकडेवारी जाहीर करावी, असं मनमोहन सिंहांनी पत्रात म्हटलं आहे.
देशात कोरोना बाधितांच्या संख्येनं आतापर्यंत सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा नवा उच्चांक गाठत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 273,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1619 कोरोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमवाव लागले आहेत. दरम्यान, 1,44,178 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याआधी राज्यात शनिवारी 261,500 नव्या कोरोन बाधितांची नोंद झाली होती.