एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेल्वेमध्ये बिल मिळालं नाही तर जेवण फुकट
येत्या मार्च महिन्यापासून रेल्वेमधील जेवणाच्या किंमतींचा तक्ते रेल्वेसह स्टेशनवर सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावले जाणार आहे. विशेष म्हणजे या तक्त्यावर एक महत्त्वाचा संदेश लिहिला जाणार आहे.
नवी दिल्ली : येत्या मार्च महिन्यापासून रेल्वेमधील जेवणाच्या किंमतींचा तक्ते रेल्वेसह स्टेशनवर सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावले जाणार आहे. विशेष म्हणजे या तक्त्यावर एक संदेश लिहिला जाणार आहे. "कृपया टिप देऊ नका, जर बिल मिळालं नाही तर तुमचं जेवण मोफत आहे". रेल्वेमधील कॅटरिंग सेवा पारदर्शी बनवण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हे पाऊल उचलले आहे.
पियुष गोयल आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत गोयल यांनी काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. प्रवाशांच्या सुविधांबाबतच्या तक्रारींसाठी रेल्वे प्रशासनातर्फे एक हेल्पलाईन नंबर सुरु केला जाणार आहे. सध्या देशभरातील 723 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफायची सेवा दिली जाते. येत्या काळात दोन हजार रेल्वे स्थानकांवर मोफत वायफायची व्यवस्था करण्यात येईल.
31 मार्च 2019 पर्यंत सर्व कॅटरिंग स्टाफ आणि टीटीई यांना स्वाईप मशीन तसेच पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन्स वितरीत केल्या जाणार आहेत. रेल्वे प्रशासन प्रवाशांना ज्या सुविधा देत आहे, त्यांच्या किमंती सार्वजनिक केल्या जाणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement