ISRO : आज इसरोचं 'बाहुबली' रॉकेट होणार लाँच, LVM3 M2 मधून 36 सॅटेलाइट उपग्रहांचं प्रक्षेपण
ISRO Commercial Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरो (ISRO) नव्या मिशन LVM3 M2 रॉकेट लाँचसाठी सज्ज आहे. याद्वारे 36 सॅटेलाईट लाँच करण्यात येणार आहेत.

ISRO Commercial Mission Countdown : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरो (ISRO) नव्या मिशनसाठी सज्ज आहे. या मिशनचं नाव LVM3 M2/OneWeb India1 आहे. इसरोचं LVM3 M2 रॉकेट लाँचसाठी तयार आहे. याद्वारे 36 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार आहेत. ISRO हे मिशन आपल्या सर्वात वजनदार रॉकेट 'LVM-3' वरून म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 मधून लाँच करणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून हे 'बाहुबली' रॉकेट 'LVM-3' लाँच करण्यात येईल. मध्यरात्री 12 वाजून 07 मिनिटांनी हे रॉकेट हवेत झेपावेल. रॉकेट LVM-3 याआधी GSLV मार्क रॉकेट म्हणूनही ओळखले जात होतं.
36 सॅटेलाइट करणार लाँच
'बाहुबली' रॉकेट 'LVM-3' याआधी GSLV मार्क रॉकेट म्हणूनही ओळखले जात होतं. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि वनवेब यांच्याद्वारे 'LVM-3' रॉकेटमधून 36 सॅटेलाईट लाँच करण्यात येतील. या मिशनद्वारे ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेबचे 36 सॅटलाईट लाँच करण्यात येतील. उपग्रहांना कॅप्स्युमध्ये बसवलं गेलं आहे. रॉकेट लाँचची अंतिम तपासणी सुरू आहे. रॉकेट 'LVM-3' इसरोचं सर्वात वजनदार रॉकेट आहे, त्यामुळे याला बाहुबली रॉकेट असंही म्हणतात. पहिल्यांदाच या रॉकेटचा वापर व्यावसायिक प्रक्षेपणासाठी प्रथमच होत आहे.
Exciting news from India as we confirm the encapsulation of our 36 satellites ahead of #OneWebLaunch14. The satellites have now travelled to be attached to the LVM3 rocket ahead of launch later this month.
— OneWeb (@OneWeb) October 14, 2022
Thanks again to our team, as well as @isro, @NSIL_India and @Arianespace! pic.twitter.com/3y5xK0PokE
वनवेब प्रायव्हेट सॅटेलाईट कंपनी
वनवेब (OneWeb) ही प्रायव्हेट ब्रिटीश सॅटेलाईट कंपनी आहे. भारतीय कंपनी इंटरप्रायजेज वनवेब कंपनीमध्ये प्रमुख शेअर होल्डर आहे. वनवेब सॅटेलाईट लाँचसह इसरो ग्लोबल कमर्शिअल लाँच मार्केटमध्ये (Global Commercial Launch) प्रवेश करेल.
LVM-3 M2/OneWeb India-1 mission: The vehicle is moved to the launch pad in the early hours today. pic.twitter.com/zF3JZgE26S
— ISRO (@isro) October 15, 2022
न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NewSpace India Limited) ही इसरोची (ISRO) व्यावसायिक शाखा आहे. तर वनवेब ही ब्रिटनमधील लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपनी आहे. इसरोने उपग्रहाचं प्रक्षेपण पाहण्यासाठी लोकांसाठी व्ह्यूइंग गॅलरी देखील उघडली आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच लोकांना रॉकेट लाँच पाहण्याची संधी मिळणार आहे.























