एक्स्प्लोर

Fastag Minimum Balance Rule: FASTag मध्ये मिनिमम बलेन्स ठेवण्याची गरज नाही, नियमात बदल

येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व वाहनांवर FASTag स्टिकर बसवणे बंधनकारक असेल. यापूर्वी डिसेंबरमध्ये, FASTag च्या अंमलबजावणीची नवीन अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती.

मुंबई : तुम्हाला दररोज महामार्गावर प्रवास करावा लागत असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानुसार, FASTag खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट काढून टाकली आहे. यापुढे FASTag खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज भासणार नाही. टोल प्लाझावर ट्रॅफिक जामची परिस्थिती उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

केवळ प्रवासी वाहनांसाठी FASTag चे नियम बदलण्यात आले आहेत. व्यावसायिक वाहनांसाठी अद्याप जुना नियम लागू आहे. FASTag च्या खरेदीदरम्यान, प्रवासी वाहनांच्या जसेकी कार, जीप, व्हॅनसाठी सिक्युरिटी म्हणून काही शिल्लक ठेवणे बंधनकारक होते. टोल प्लाझावरुन जात असताना ड्रायव्हरच्या FASTag रिचार्ज नसल्यास वाहनांना टोलवर थांबावं लागत होतं. यामुळे टोल प्लाझावर ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. पण आता असं होणार नाही. टोल प्लाझा पार केल्यानंतर, जर आपल्या खात्यात उणे शिल्लक राहिली असेल तर, बँक सिक्युरिटी मनी वसूल करू शकेल, जे वाहन मालकास पुढील रिचार्जवर भरावे लागेल.

15 फेब्रुवारीपासून FASTag अनिवार्य होणार

केंद्र सरकारने आता संपूर्ण देशात FASTag सक्तीचे केले आहे. महामार्गावर टोल भरताना आपल्याला FASTag द्वारे पैसे द्यावे लागतील. 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व वाहनांवर FASTag स्टिकर बसवणे बंधनकारक असेल. यापूर्वी डिसेंबरमध्ये, FASTag च्या अंमलबजावणीची नवीन अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती.

Maharashtra RTO Rules: परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? काय आहेत RTO चे नियम?

FASTag कुठे उपलब्ध होईल?

जर आपण अद्याप आपल्या वाहनावर FASTag स्टिकर लावले नसेल तर तुम्हाला ते लवकरच लावले पाहिजे. पेटीएम, अॅमेझॉन, स्नॅपडील इत्यादींकडून FASTag खरेदी केलं जाऊ शकतं. तसेच, देशातील 23 बँकांच्या माध्यमातून FASTag उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त रस्ते वाहतूक प्राधिकरण कार्यालयातही FASTag ची विक्री केली जाते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) त्यांच्या उपकंपनी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) च्या माध्यमातूनही FASTag ची विक्री करते.

वाहन कर्ज ईएमआय कॅल्क्युलेट

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानुसार FASTag ची किंमत 200 रुपये आहे. यात तुम्ही किमान 100 रुपये रिचार्ज करू शकता. जोपर्यंत FASTag स्कॅनर स्कॅन करतो, तोपर्यंत FASTag काम करेल.

Maharashtra RTO Rules | एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन आणताना नोंदणी करणं गरजेचं; जाणून घ्या RTO चे नियम!

WEB EXCLUSIVE | परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? 'हे' आहेत RTO चे नियम?

">

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget