Farmers protest update | कथित सुपारी किलरचा यु- टर्न, 'शेतकऱ्यांनी सांगितलं तेच बोललो'
शेतकरी आंदोलनात हिंसा घडवण्याच्या कामगिरीसाठी एका पोलिसानं आपल्याला पाठवलं होतं, अशी कथित कबुलीही त्यानं दिली होती.
Farmers protest update दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा एकिकडे निकाली निघत नसतानाच दर दिवसाआड केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये असणारा संघर्ष आणखी पेटताना दिसत आहे. त्यातच आता भर पडली आहे, ती म्हणजे एका सुपारी किलरच्या कबुलीची. शेतकरी आंदोलनात हिंसा घडवण्याच्या कामगिरीसाठी एका पोलिसानं आपल्याला पाठवलं होतं, अशी कथित कबुलीही त्यानं दिली होती. 26 जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर परेड करणार आहेत, त्यात गोंधळ घालण्यासाठी आणि मंचावरच्या 4 शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचाही कट असल्याचा खळबळजनक दावा तरुणानं माध्यमांसमोर केला होता, पण आता मात्र त्यानं यावर घुमजाव केला आहे.
अत्यंत खळबळजनक असे आरोप केल्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी केली. याबाबत माहिती देताना सोनीपतचे एसपी जशनदीप सिंह रंधावा म्हणाले, या (कथिक सुपारी किलरनं) मुलानं म्हटलं होतं की राई पोलीस स्थानकातील पोसील इंन्स्पेक्टर प्रदीप, एसएचओकडून त्याला हे काम सोपवण्यात आलं होतं. ज्यानंतर प्राथमिक चौकशीत ही बाब सिद्ध झाली की प्रदीप नावाचे कोणीही इन्स्पेक्टर या पोलीस स्थानकात किंवा जिल्ह्यातही नाही आहेत'.
पुढं त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण सोनीपतचा रहिवासी असून, तो बेरोजगार आहे. चौकशीमध्ये ही बाबही समोर आली आहे की, छेडछाडीच्या आरोपांमुळं शेतकरी आंदोलनातील स्वयंसेवकांसोबत त्याचा वाद झाला होता. त्याला एका कॅम्पमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली, ज्यानंतर त्याला भीती दाखवत अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यास भाग पाडलं.
दरम्यान, पोलिसांकडून तरुणाची चौकशी करण्यात आली. क्राइम ब्रांचकडूनही त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथामिक माहितीनुसार हा तरुण 21 वर्षांचा आहे. जिथं आंदोलन सुरु आहे तिथून 50 किमी अंतरावरच्या सोनिपत गावचा रहिवाशी आहे. या तरुणाची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीय, त्याच्याकडून कुठली हत्यारंही पोलिसांना सापडलेली नाहीयत. त्यामुळे पोलीस सध्या तरी या षडयंत्राबद्दल काही पुरावे मिळालं नसल्याचं सांगतायत पण पुढची चौकशी सुरु आहे.
The masked man who addressed a press conference with farmer leaders y'day has said in his viral video that he was reading a script given to him by them. This video hasn't been validated by police who say they will give more info this afternoon.
(screenshot from the viral video) https://t.co/OL3ATXHzzB pic.twitter.com/R1jyalbMOZ — ANI (@ANI) January 23, 2021
शेतकरी आणि केंद्राची चर्चा निकाली नाहीच
शेतकरी आणि सरकारमधली चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वळणावर गेली. कारण सरकारनं दीड वर्षे कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला होता. पण तोही फेटाळण्यात आला. अशा परिस्थितीत या नाट्यमय आरोपानं सरकार आणि शेतकऱ्यांमधलं वातावरण पुन्हा तापलं आहे.