एक्स्प्लोर
जम्मू-काश्मिरमध्ये चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मिरच्या शोपियामध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रात्रीपासून शोपियामध्ये सैन्याची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु होती. आज रविवारी सकाळी पाच दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर काश्मिर पोलिसांच्या डीजीपींनी ट्वीट करुन ऑपरेशन संपल्याचं जाहीर केलं.
![जम्मू-काश्मिरमध्ये चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा encounter breaks out between terrorists and security forces in shopiyan kashmir latest updates जम्मू-काश्मिरमध्ये चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/24101813/army.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
श्रीनगर : जम्मू-काश्मिरच्या शोपियामध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रात्रीपासून शोपियामध्ये सैन्याची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु होती. आज रविवारी सकाळी पाच दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर काश्मिर पोलिसांच्या डीजीपींनी ट्वीट करुन ऑपरेशन संपल्याचं जाहीर केलं.
जम्मू-काश्मिरच्या शोपियातील बडगाव जैनपुरामध्ये आज सकाळी हे एन्काऊंटर करण्यात आलं. ज्यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं. तसंच एक पोलिस कर्मचारी आणि एक सैन्याचा जवानही जखमी झाले आहेत.
खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये काश्मिर युनिव्हर्सिटीतील एका असिस्टंट प्रोफेसरचा समावेश आहे, जो सोशिओलॉजी विभागात शिकवत होता. हा प्रोफेसर शुक्रवारपासून बेपत्ता होता आणि आज रविवारी तो हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये दाखल होणार होता. या चकमकीत हिजबुलचा कमांडर सद्दाम पद्दारही मारला गेला. सद्दाम बुरहान वानीचा जवळचा मित्र होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)