एक्स्प्लोर

राष्ट्रपती निवडणुकीचं बिगुल वाजलं

नवी दिल्ली: देशाचे 14 वे राष्ट्रपती निवडण्यासाठीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. कोण होणार नवा राष्ट्रपती? प्रणव मुखर्जींचा वारसदार नेमका कोण असणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यामुळे लवकरच मिळतील. मोदी विरुद्ध सगळे अशा आणखी एका लढाईसाठी या निवडणुकीच्या निमित्तानं मैदान सज्ज झालं आहे. राष्ट्रपतीपदासाठी एकमत होऊ शकलं नाही तर 17 जुलैला मतदान आणि 20 जुलैला निकाल जाहीर होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपतो आहे. एनडीए आणि यूपीए या दोन्ही बाजूंनी या निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरु आहेत. नुकतीच दिल्लीत काँग्रेेस अध्यक्षा सोनिया गांधींनी या निवडणुकीच्या रणनीतीसाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्याला 17 पक्षांनी हजेरी लावलेली होती. यूपीच्या महाविजयानंतर एनडीएचं संख्याबळ वाढलेलं आहे. शिवाय जगमोहन रेडड्डी यांचा वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रसमितीचे के सी आर राव यांच्या पक्षानं एनडीएला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. पण तरीही यूपीएकडून तुल्यबळ लढत देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यूपीएनं उमेदवारांच्या शोधसमितीसाठी शरद पवार यांना समन्वयक म्हणून नेमलेलं आहे. त्यामुळे एखादा सर्वसहमतीचा उमेदवार पुढे येतो का हे ही पाहणं महत्वाचं आहे. राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया : - उमेदवाराच्या अर्जावर ५० प्रस्तावक, ५० अनुमोदक असणं गरजेचं. - उमेदवाराला निवडणुकीसाठी १५ हजार रूपये अनामत रक्कम जमा करावी लागणार. - संसद, राज्यांच्या विधानसभा, दिल्ली व पुडुच्चेरी या केंद्रशासित राज्यांच्या विधानसभा या ठिकाणी मतदान होणार - गुप्त मतदान पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. - निवडणूक आयोगानं दिलेल्या विशेष पेनानंच मतदान केलं जाईल. - यात मतदारांना पसंती क्रम द्यायचे असतात ( १ ते... जितके उमेदवार) - राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी कुठलाही व्हिप जारी करू शकत नाही. - लोकसभेचे सेक्रेटरी जनरल, राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल हे संसदेच्या मतदानासाठी निवडणूक अधिकारी राष्ट्रपती निवडणुकीची वैशिष्ट्ये- - निवडणुकीची अधिसूचना १४ जून रोजी काढण्यात येईल. - अर्ज करण्यासाठी शेवटी तारीख २८ जून असणार आहे. - उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी २९ जूनला होईल.   - १ जुलै अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम तारीख असेल. - मतदानाची गरज पडली तर १७ जुलैला मतदान होईल. - मतमोजणी २० जुलैला होईल. संबंधित बातम्या:   राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी?

राष्ट्रपती व्हायचं असेल, तर पवारांनी एनडीएत यावं: आठवले

राष्ट्रपती निवडणुकीची खलबतं, सोनिया गांधींनी बोलावली देशभरातील 17 विरोधी पक्षांची बैठक

स्पेशल रिपोर्ट : कोण होणार राष्ट्रपती?

उद्धव ठाकरे दिल्लीत, राष्ट्रपती निवडणुकीबाबत खलबतं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sunil Tingre: 'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
Radhanagari Vidhan Sabha : मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Kedar Vs Aashish Jaiswal : जैस्वालांना धडा शिकवण्यासाठी बंडखोरी - केदारABP Majha Headlines :  12 PM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :14 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sunil Tingre: 'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
Radhanagari Vidhan Sabha : मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Rupali Chakankar : हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Embed widget