India: सावधान! डॉक्टरांशी गैरवर्तन पडणार महागात; रुग्णावर उपचार नाकारण्याचा डॉक्टरांना मिळाला अधिकार
Doctor Rule: डॉक्टरांशी गैरवर्तन केल्यास संबंधित रुग्णावर उपचार न करण्याचा अधिकार डॉक्टरांना देण्यात आला आहे.
Nagpur: डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी महत्त्वाची बातमी. आता रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांसोबत (Doctor) गैरवर्तवणूक केल्यास डॉक्टर संबंधित रुग्णावर उपचार करण्याचे नाकारू शकणार आहेत, नॅशनल मेडिकल कौन्सिलने त्यासंदर्भात निर्णय घेत डॉक्टरांना उपचार करणे नाकारण्याचा अधिकार दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच, आयएमएने (IMA) यासंदर्भात समाधान व्यक्त करत या निर्णयामुळे डॉक्टरांची सुरक्षितता अबाधित राहील, असं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, नॅशनल मेडिकल कौन्सिलने डॉक्टरांना कोणत्याही औषधाचा ब्रँड (Medicine Branding) औषध किंवा उपकरणांचे समर्थन करण्यास किंवा त्यांची जाहिरात करण्यास मनाई केली आहे.
डॉक्टरांशी गैरवर्तन करणं पडेल महागात
जर तुम्ही एखाद्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरसोबत अपमानास्पद वागणार असाल, रुग्णासोबतचे नातेवाईक डॉक्टरसोबत गैरवर्तन करणार असतील, तर डॉक्टर संबंधित एखाद्या रुग्णाचा उपचार करण्याचे नाकारू शकणार आहे. नॅशनल मेडिकल कौन्सिलने त्यासंदर्भात निर्णय घेत डॉक्टरांना उपचार करण्यास नाकारण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे डॉक्टरांसोबत गैरवर्तवणूक केल्यानंतर अमक्या डॉक्टरने आमच्या रुग्णावर उपचार नाकारले, हे सबब आता चालणार नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनने नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे.
डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय
डॉक्टरांची सुरक्षितता आणि डॉक्टरी व्यवसायाची प्रतिमा अबाधित ठेवण्यासाठी नॅशनल मेडिकल कौन्सिलचा निर्णय योग्य असल्याचं मत आयएमएच्या नागपूर क्षेत्राच्या अध्यक्षा डॉ. वंदना काटे यांनी व्यक्त केलं आहे. रुग्णाची विशिष्ट वैद्यकीय स्थिती पाहता आणि वर्तमान काळात प्रत्येक रोगासाठी विशिष्ट पॅथी आणि तज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळे अनेक वेळेला डॉक्टर संबंधित रुग्णाला माझ्याकडे नको, तर विशिष्ट ठिकाणी घेऊन जा, असं मत व्यक्त करतात. मात्र रुग्णांचे नातेवाईक ते ऐकायला तयार नसतात आणि डॉक्टरांशी वाद घालतात. नॅशनल मेडिकल कौन्सिलने आता डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार नाकारण्याचा अधिकार दिल्यामुळे अशा स्थितीत डॉक्टरांची सुरक्षितता आणि अधिकार अबाधित राहू शकतील, अशी प्रतिक्रिया डॉ वंदना काटे यांनी दिली आहे.
रुग्णावर उपचार नाकारण्याआधी करावी लागणार नोंद
दरम्यान, रुग्णाला उपचार नाकारताना डॉक्टरांना प्रक्रियेची पूर्तता करावी लागणार आहे. अपमानास्पद, अनियंत्रित आणि हिंसक रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या बाबतीत नोंदणीकृत वाईट वर्तन फाईल करून डॉक्टर तास अहवाल देऊ शकतात, त्यानंतरच अशा रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टर नकार देऊ शकतात.
विशिष्ट औषधाचा आग्रह धरता येणार नाही
नॅशनल मेडिकल कौन्सिलने डॉक्टरांना नुसतं उपचार नाकारण्याचा अधिकारच दिलेला नाही, तर विशिष्ट औषध किंवा विशिष्ट ब्रँडसाठी आग्रह धरू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. दरम्यान, या अपेक्षेबद्दल अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या डॉक्टरांचं मत वेगळं आहे. त्यांच्या मते डॉक्टर विशिष्ट रोगावर विशिष्ट औषधाचाच चांगला परिणाम होतो, असा पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊनच संबंधित औषध प्रिसक्राईब केले जाते, त्यामुळे नॅशनल मेडिकल कौन्सिलने जरी डॉक्टरांनी विशिष्ट औषधाचा, विशिष्ट ब्रँडचा आग्रह धरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली असली तरी बहुतांशी डॉक्टर तसं करत नसल्याचा दावा केला जात आहे.
इतरही नियम दिले आखून
एवढंच नाही, तर नॅशनल मेडिकल कौन्सिलने राजपत्रात जारी केलेल्या नियमांनुसार, नोंदणीकृत डॉक्टर्सने किंवा त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांनी औषध निर्मिती करणाऱ्यांकडून कोणत्याही भेटवस्तू, प्रवास सुविधा, आदरातिथ्य, रोख किंवा आर्थिक अनुदान, सल्लागार शुल्क किंवा मानधन किंवा औषध निर्मितीतून मनोरंजन किंवा करमणूक मिळू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health Tips: अनेक आजारांवर मसाल्यातला 'हा' प्रकार ठरेल उपयुक्त; आयुर्वेदाप्रमाणेच आहेत गुणधर्म
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )