एक्स्प्लोर
नोटा बदलल्यानंतर आजपासून बोटाला शाई लागणार
![नोटा बदलल्यानंतर आजपासून बोटाला शाई लागणार Demonetisation Government Introduces Indelible Ink To Stop Multiple Currency Exchanges In Bank नोटा बदलल्यानंतर आजपासून बोटाला शाई लागणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/16031953/Bank_Ink.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : देशातील सर्व बँकांमध्ये आजपासून नोटा बदलल्यानंतर मतदानाप्रमाणे निशाणी म्हणून ग्राहकाच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. पैसे बदलण्यासाठी तेच तेच लोक सातत्याने रांगेत उभे राहात असल्याने गर्दी वाढत आहे. त्यामुळे ग्राहकाला शाई लावण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास मंगळवारी जाहीर केलं.
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर त्या बदल्यासाठी तसंच जमा करण्यासाठी नागरिक बँकांबाहेर प्रचंड गर्दी करत आहे. परंतु पैसे बदल्यासाठी वारंवार तेच लोक बँकांबाहेर रांगा लावून नोटा बदलून घेत आहेत. यामध्ये गर्दी वाढत आहे. अनेक जणांनी काहींना कमिशन देऊन या कामाला लावलं आहे. परिणामी गरजूंना पैसे बदलून मिळण्यास अडचणी येत आहेत, अशी तक्रार येऊ लागल्याने सरकारने शाई लावण्याचा अनोखा उपाय केला आहे.
रांग टाळण्यासाठी बोटाला शाई, तर रंग जाणारी 2 हजाराची नोट खरी
ही शाई अनेक दिवस जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांना बँकेत वारंवार नोटा बदलता येणार नाही. सामान्यत: निवडणुकीतील मतदानाच्या वेळी मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लावतात. परंतु येत्या काळात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे डाव्या हाताच्या बोटाला शाई लावल्यास अडचण होऊ शकते. म्हणून पैसे बदल्याण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या उजव्या हाताच्या बोटाला ही शाई लावण्यात येईल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)