Delhi Blast : बॉम्ब स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा कसे काम करतात? काय असतो सिक्युरिटी प्रोटोकॉल?
Delhi Red Fort Blast : एखाद्या ठिकाणी स्फोट झाला तर त्या ठिकाणी सर्व सुरक्षा यंत्रणा समन्वय साधून तपास करतात. त्यामध्ये स्टँडर्ड प्रोटोकॉल पाळला जातो.

Delhi Red Fort Bomb Blast : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटात (Delhi Blast) आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू तर 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर अनेक सुरक्षा संस्था (Security Agencies) तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अशा कोणत्याही ब्लास्टनंतर तपास कसा सुरू होतो आणि शेवटपर्यंत पूर्ण प्रोटोकॉल (Investigation Protocol) कसा पार पडतो, याची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल होतात. त्यांचे प्रथम उद्दिष्ट असते जीव वाचवणे आणि परिसर सुरक्षित करणे. त्यानंतर ती जागा सील केली जाते जेणेकरून पुरावे नष्ट होणार नाहीत.
Initial Response and Rescue : प्राथमिक कृती आणि बचावकार्य
स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, फायर ब्रिगेड आणि मेडिकल टीम तातडीने परिसराचा ताबा घेतात. परिसर धुराने आणि मलब्याने भरलेला असतो. त्यामुळे इमारती रिकाम्या करून सुरक्षितता सुनिश्चित केली जाते. मेडिकल टीम जखमींची तपासणी करून गंभीर जखमींना त्वरित रुग्णालयात हलवते.
Forensic Examination EOD Scan : फॉरेन्सिक तपास आणि विस्फोटक शोध
बचावकार्य सुरू असतानाच EOD टीम परिसरातील प्रत्येक भाग तपासून आणखी कोणतेही स्फोटक यंत्र बसवलेले नाहीत याची खात्री करते. त्यानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञ मलब्यातून धातूचे तुकडे, अवशेष, तारांचे पुरावे आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट्स गोळा करतात. या नमुन्यांवरून कोणता स्फोटक प्रकार वापरला, त्याचा स्त्रोत काय आणि ब्लास्ट पॅटर्न कसा आहे हे निश्चित केले जाते.
Intelligence Coordination and Analysis : इंटेलिजन्स समन्वय आणि तपास
या टप्प्यात NIA, IB, ATS आणि स्थानिक पोलीस सर्व माहिती एकत्रित करून विश्लेषण करतात. सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन, आर्थिक व्यवहार, प्रवास नोंदी यांचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. देशातील इतर भागांनाही अलर्ट जारी करण्यात येतो, जेणेकरून कोणते नेटवर्क सक्रिय असल्यास वेळेत रोखता येईल.
अशा परिस्थितीत अफवा संकट वाढवू शकतात. त्यामुळे प्रशासनाकडून अधिकृत माहिती, हेल्पलाइन क्रमांक प्रसारित केले जातात. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना स्वतःहून माहिती दिली जाते. मीडिया संस्थांना फक्त अधिकृत आणि प्रमाणित माहितीच दिली जाते.
ही बातमी वाचा:
























