एक्स्प्लोर
'जैश..'चा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्लीत अटक
पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड मुदस्सिर याचा सहकारी आणि जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खान (27) याला अटक करण्यात आली आहे.
!['जैश..'चा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्लीत अटक Delhi police arrested Jaish terrorist Sajjad Khan 'जैश..'चा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्लीत अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/15123540/Pulwama-Terror-Attack.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड मुदस्सिर याचा सहकारी आणि जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खान (27) याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री लाल किल्ला परिसरातून अटक केली आहे. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी सज्जादकडे चौकशी करत आहेत.
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलीस दल)जवानांच्या बसवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. मुदस्सिर अहमद खान हा त्या हल्ल्यामागचा मास्टर माईंड होता. भारतीय जवानांनी त्याला एका चकमकीत ठार केले आहे. आता त्याच्या सहकाऱ्याला पकडल्याने हे सुरक्षा दलासाठी मोठे यश असल्याचे बोलले जात आहे.
दिल्ली पोलिसांनी सज्जादला अटक केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी आता सज्जादची चौकशी करत आहेत. दरम्यान भारतीय सेनेने सांगितले की, जैशचा दहशतवादी मुद्दसिर पुलवामा हल्ल्यामागचा मास्टरमाईंड होता. सज्जाद हा त्याचा जवळचा सहकारी होता.
भारतीय सेनेने सांगितले की, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरमध्ये कारवाई सुरु केली आहे. या कारवाईदरम्यान जम्मू काश्मीरच्या शोपियान, बारामुल्ला, बंदीपोरा, राजौरी, काश्मीर भागात अनेक चकमकी झाल्या आहेत. या चकमकींमध्ये आतापर्यंत 22 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
Jaish e Mohammad terrorist Sajjad Khan arrested by Delhi Police Special Cell. He was a close associate of Pulwama attack mastermind Mudassir who had been eliminated earlier this month
— ANI (@ANI) March 22, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)