(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi : वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीच्या मृत्यूनंतरही जावई आणि नातवांचा हक्क; दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय
Delhi : कोर्टानं सुनावणी दरम्यान सांगितलं, जर मुलीचा मृत्यू झाला तर वडिलांच्या संपत्तीमध्ये जावई आणि नातवांचा हक्क असेल.
Delhi : मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या संपत्तीवर नक्की कोणाचा अधिकार असेल, याबाबत नुकताच दिल्ली कोर्टानं एक मोठा निर्णय घेतला आहे. गुरूवारी (31 मार्च) मालमत्तेच्या वादावर सुनावणी करताना दिल्ली (Delhi) कोर्टनं सांगितलं की, मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या संपत्तीत जावई आणि नातवांचा हक्क असेल. न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत मालमत्तेची विक्री किंवा अन्य कोणताही अधिकार दुसऱ्या पक्षाला देण्यास स्थगिती दिली आहे.
मालमत्तेबाबत भाच्यानं आपल्या दोन मामांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे
गुरुवारी दिल्लीतील साकेत येथील नरेश कुमार लाकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान कोर्टानं आदेश दिला. या प्रकरणात भाच्यानं दोन प्रकरणांविरोधात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये आजोबांच्या मालमत्तेत मामाने हक्क दिला नाही, असे म्हटले आहे.
नातवंड आणि पतीचा संपत्तीमध्ये आहे अधिकार- कोर्ट
कोर्टानं सुनावणी दरम्यान सांगितलं, जर मुलीचा मृत्यू झाला तर वडिलांच्या संपत्तीमध्ये जावई आणि नातवांचा हक्क असेल. या प्रकरणातजोपर्यंत मालमत्तेतील हिस्सा निश्चित होत नाही तोपर्यंत दुसरा पक्ष मालमत्ता विकू शकत नाही, असही कोर्टानं सांगितलं.
तसेच कोर्टानं सांगितलं की, याचिका करणाऱ्याची आई ही तिच्या वडिलांच्या संपत्तीची वारसदार होती. याचिका करणाऱ्याचाही त्या संपत्तीमधील एक तृतीयांश भागावर हक्क होता. त्याचबरोबर या प्रकरणाच्या पुढील तारखेपर्यंत संबंधित कार्यालयाने सर्व मालमत्तांचे मूल्यांकन करावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पुढील आदेशापर्यंत मालमत्तेच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- 1 एप्रिलपासून बँकेचे नियम बदलणार, औषधं महागणार, जीएसटीतही बदल; जाणून घ्या काय आहेत 10 मोठे बदल
- April Fool's Day : 'एप्रिल फुल डे' साजरा करण्यामागचं कारण माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या...
- Viral Video : समुद्रात पोहताना महिलेच्या कानात शिरला खेकडा, पुढे काय झालं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha