Covovax : लहान मुलांसाठी बनवलेली कोरोना लस Covovax प्रौढांसाठी देखील उपलब्ध? अदर पूनावाला यांची महत्वाची माहिती
Covovax Vaccine : सध्या सरकारकडून लहान मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस देण्यावर भर आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदार पूनावाला यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
Covovax Vaccine : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये वाढ झाली असून, त्यामुळे कोरोना संसर्गाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच सरकारकडून लहान मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस देण्यावर भर आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदार पूनावाला यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
लहान मुलांसाठी बनवलेली कोवोव्हॅक्स लस आता प्रौढांसाठी सुद्धा
अदर पूनावाला यांनी बुधवारी सांगितले की, लहान मुलांसाठी बनवलेली कोवोव्हॅक्स लस 12 वर्षांवरील सर्व लोकांसाठी उपलब्ध आहे. याआधी पूनावाला यांनी ट्विट केले की, नोव्हावॅक्सकडून विकसित केलेली कोवोव्हॅक्स आता भारतात मुलांसाठी उपलब्ध आहे. तसेच त्याची परिणामकारकता 90 टक्क्यांहून अधिक आहे. पूनावाला म्हणाले की, "भारतात उत्पादित केलेली ही एकमेव लस आहे जी युरोपमध्येही विकली जाते.
A lot of you have asked if Covovax is available for adults. The answer is yes, it is available for everyone above the age of 12.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) May 4, 2022
अँटी-कोविड लस खाजगी केंद्रांवर
अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, आता 12-17 वयोगटातील मुलांना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) कडून 'कोव्हॉवॅक्स' ही अँटी-कोविड लस खाजगी केंद्रांवर मिळू शकते आणि या संदर्भात कोविन अॅपवर तरतूद देखील करण्यात येत आहे. गेल्या वर्षी 28 डिसेंबरला भारताच्या औषध नियामकाने कोवोव्हॅक्सला प्रौढांमधील आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापरासाठी मान्यता दिली होती आणि 9 मार्चला काही अटींसह 12-17 वयोगटातील वापरास परवानगी दिली होती.
संबंधित बातम्या