एक्स्प्लोर

Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?

एक्सिस माय इंडिया या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या एक्झिट पोलमधून राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई : राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या मतदानानंतर अनेक एक्झिट पोलमधून राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर, काही सर्वेक्षणातून महाविकास आघाडीलाही बहुमताचा आकडा गाठता येईल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणूक एक्झिट पोलमधील आकडेवारी पाहिल्यास राज्यात अत्यंत चुरशीचा सामना होत असून अपक्ष व इतरांकडे सत्तेच्या चाव्या जाण्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री पदासाठी चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे. राज्यात मी पुन्हा येईन म्हणत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार पुन्हा स्थापन केलं. मात्र, मुख्यमंत्रीपदाची (Chief minister) माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही. याउलट, शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याने राज्यातील राजकीय गणतिचं वेगळी पाहायला मिळालं. त्यामुळे, 2024 च्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. Axis My India या संस्थेच्या Exit Poll नुसार राज्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याचे म्हटले आहे. 

एक्सिस माय इंडिया या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या एक्झिट पोलमधून राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, राज्यातील 288 जागांपैकी महायुतीला 178-200 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला 288 पैकी केवळ 82-102 जागा मिळतील, असा अंदाज आहे. महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई वगळता इतर ठिकाणी फार यश मिळत नसल्याचा अंदाज एक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. इतरांना 6-12 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  याच संस्थेकडून राज्यातील मुख्यमंत्रीपदासाठीही जनमत घेण्यात आले आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सर्वाधिक पसंती आहे. एकनाथ शिंदे यांना 31 टक्के लोकांची पसंती दिसून येते. 

या सर्वेक्षणानुसार महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना 31 टक्के जनतेची पसंती असून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना 18 टक्के नागरिकांची पसंती आहे. या यादीत देवेंद्र फडणवीसांचा तिसरा नंबर लागतो, त्यांना 12 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 2 टक्के शरद पवार यांना 5 टक्के, काँग्रेसच्या नाना पटोले यांना 2 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांना 1 टक्के लोकांची पसंती आहे. तर, काँग्रेसकडून इतर कोणीही मध्ये 10 टक्के लोकांना पसंती दर्शवली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या 3 पसंतीच्या चेहऱ्यांमध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठा उद्धव ठाकरे यांचीच नावे आहेत. 

सीएमपदाची पसंती कुणाला?, पसंतीच्या टक्केवारीसह

महायुती

1. एकनाथ शिंदे 31
2. देवेंद्र फडणवीस 12
3. नितीन गडकरी 2
4. अजित पवार 2
5. भाजपचे इतर कुणी 5
------------

महाविकास आघाडी

1.उद्धव ठाकरे 18
2. शरद पवार 5
3. नाना पटोले 2
4. पृथ्वीराज चव्हाण 1
5. जयंत पाटील 1
6. काँग्रेसकडून इतर कुणी 10
---------------
इतर 

1. प्रकाश आंबेडकर 3
2. राज ठाकरे 2
3. इतर/माहिती नाही 6

हेही वाचा

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
Embed widget