एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी

maharashtra vidhan sabha election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आणखी एक धक्कादायक एक्झिट पोल. यंदा 30 वर्षातील मतदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्यासाठी आता अवघे 24 तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सची (Maharashtra Elections 2024) चर्चा सुरु आहे. मतदान संपल्यानंतर म्हणजे 20 नोव्हेंबरला काही संस्थांचे एक्झिट पोल्स जाहीर झाले होते. यापैकी बहुतांश एक्झिट पोल्समध्ये महायुतीची सरशी होताना दिसत होती. मात्र, गुरुवारी जाहीर झालेल्या प्रजातंत्रच्या एक्झिट पोलमध्ये (Prajatantra exit poll) महायुतीची सरशी होताना दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळले. तर महायुतीला फक्त 127 जागांवर समाधान मानावे लागू शकते. त्यामुळे प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी बहुमतासाठी लागणारा 145 जागांचा आकडा पार करुन सरकार स्थापन करु शकते. 

प्रजातंत्रच्या एक्झिट पोलचा सविस्तर अंदाज खालीलप्रमाणे

महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळेल. यामध्ये मराठवाड्यातील 30, मुंबईत 18, उत्तर महाराष्ट्रात 23, ठाणे आणि कोकणात 17, विदर्भात 31 आणि पश्चिम महाराष्ट्रातील 30 जागांचा समावेश आहे.

महायुतीचा विजय कुठे-कुठे होणार?

प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला राज्यातील 288 पैकी 127 विधानसभा मतदारसंघात विजय मिळेल. तसे घडल्यास भाजप अपक्ष आणि बंडखोरांच्या मदतीने 145 ची मॅजिक फिगर गाठण्याची कसरत करणार का आणि त्यामुळे घोडेबाजार होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महायुतीला कुठे किती जागांवर विजय मिळणार?

मराठवाड्यात 15 जागा मिळतील
मुंबईत 18 जागा मिळतील
उत्तर महाराष्ट्र 21 जागा मिळतील
ठाणे-कोकण 18 जागा मिळतील
विदर्भ 29 जागा मिळतील
पश्चिम महाराष्ट्र 26 जागा मिळतील

राज्यात मतदानाचा टक्का वाढला

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गेल्या 30 वर्षांमधील मतदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. लोकसभा निवडणुकीत तब्बल 61 टक्के मतदान झाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. अंतिम आकडेवारीनुसार यंदा राज्यभरात सरासरी 66.05 टक्के मतदान झाले. हे वाढलेले मतदान कोणासाठी फायदेशीर ठरणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. साधारणत: एखाद्या निवडणुकीत मतदानचा टक्का वाढल्यास तो प्रस्थापितविरोधी कल मानला जातो. मात्र, यंदा महाराष्ट्रात वाढलेले मतदान हे लाडकी बहीण योजनेचे यश असल्याचा दावा सत्ताधारी महायुतीकडून केला जात आहे. अनेक बड्या नेत्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूरच्या कागल मतदारसंघात झाले. याठिकाणी तब्बल 81 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजे 52 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. 

आणखी वाचा

मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण? एक्झिट पोलमध्ये खळबळजनक खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Embed widget