परवानगी अभावी 7 ते 11 वर्षांपर्यंतच्या मुलांची कोव्होवॅक्स लस रखडली ; आदर पुनावालांची माहिती
सात ते 11 या वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आली आले. ही लस मंजुरीच्या प्रितिक्षा आहे, अशी माहिती पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी दिली आहे.
Corona Vaccine : जगभरात गेल्या दोन-ते अडीच वर्षांपासून कोरोना (Corona ) महामारीच्या संकटाने थैमान घातले आहे. भारतावरही कोरोनाचे संकट आहे. परंतु, देशात लसीकरण चांगल्या प्रकारे झाल्यामुळे सध्या कोरोना अटोक्यात आहे. आता सात ते 11 या वयोगटातील मुलांसाठी देखील कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आली आले. ही लस तयार झाली असून त्यासाठी सरकारच्या मंजुरीची प्रितिक्षा आहे, अशी माहिती पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी दिली आहे. 'टाइम्स नेटवर्क'च्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुनावाला यांनी ही माहिती दिली.
"कोवोव्हॅक्स लसीला नियामक मान्यता मिळाली असून ती युरोपीय देश आणि ऑस्ट्रेलियालाही पुरवली जात आहे. सिरमने तयार केलेल्या डोसचा अपव्यय टाळण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पासून कोविड लसीचे उत्पादन थांबवले आहे. सध्या सिरम इन्स्टिट्यूटकडे सुमारे 20 कोटी डोस उपलब्ध आहेत, अशी माहिती पुनावाला यांनी दिली.
अदर पुनावाला म्हणाले, मुलांना लस देण्याची अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहे. परंतु, याबाबतचे निर्णय घेण्याची जबाबदारी असलेल्या लोकांकडून आणि समित्यांकडून होत असलेला दिरंगाईवरून असे वाटते की त्यांना कोणत्याही प्रकारची घाई नाही. कोरोना महामारीविरोधातील लढाईत आपल्याला निर्णायक टप्प्यावर आणणारी लसीकरणाची गती सध्या हरवली आहे. "
"कोविशील्डच्या डोसची किंमत 600 रुपयांवरून 225 रुपयांपर्यंत कमी करूनही लोक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. ज्यांना आधीच दोन्ही नियमित डोस मिळाले आहेत त्यांच्यासाठी बूस्टर डोस आवश्यक आहे. देशामध्ये आणि देशाबाहेर प्रवास करण्यासाठी जास्त प्रतिकारशक्तीची आवश्यकता आहे. ही प्रतिकारशक्ती कायम ठेवण्यासाठी बुस्टर डोस घेणे आवश्यक आहे, असे पुनावाला म्हणाले.
पूनावाला म्हणाले, बूस्टर डोस नऊ महिन्यांऐवजी सहा महिन्यांच्या अंतराने दिल्यास कोरोनाचा धोका कमी होईल. पैसे कमावण्यासाठी दोन नियमित डोसनंतर बूस्टर डोस देण्याची शिफारस करत नाही. पहिल्या दोन कोरोनाच्या लाटांमध्ये जी परिस्थीती उद्भवली ती आता उद्भवू नये. वृद्ध आणि लहान मुलांच्या आयुष्याची किंमत आपण कशातच करून शकत नाही. अशा परिस्थितीत दुसऱ्या लाटेसारखी वेळ येण्याआधीच निर्णय घेणे काळाची गरज आहे."