एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधानांकडून लॉकडाऊन 4 चे संकेत, 15 मेपर्यंत ब्लू प्रिंट देण्याची राज्यांना सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मे रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यादरम्यान त्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याचे संकेत दिले. तसंच 15 मेपर्यंत ब्लू प्रिंट देण्याचे निर्देशही राज्यांना दिले.

नवी दिल्ली : 17 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. त्याआधी म्हणजेच काल (11 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे सहा तास चर्चा केली. पंतप्रधानांनी 15 मेपर्यंत सर्व राज्यांना ब्लू प्रिंट देण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत 'जान है तो जहान है' असं म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींनी आता 'जन सेवक जग तक' हा नवा नारा दिला आहे. या नव्या नाऱ्यातच लॉकडाऊन 4 चे संकेत आहेत.

कसा असेल लॉकडाऊन-4? पंतप्रधानांनी काल मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला, त्यावेळी लॉकडाऊन 4 कसा असेल या मोठ्या प्रश्नाचे संकेत खुद्द त्यांनीच दिले. या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, "लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील आवश्यक उपायांची गरज नव्हती. अशाचप्रकारे तिसऱ्या टप्प्यातील आवश्यक उपाययोजनांची गरज चौथ्यामध्ये नाही, असं माझं मत आहे." या बैठकीत पंतप्रधान जे काही म्हणाले त्यावरुन लॉकडाऊन 4 चे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

याशिवाय पंतप्रधानांनी बैठकीत जे मुद्दे मांडले त्यावर नजर टाकूया...

* सर्व मार्ग पुन्हा सुरु केले जाणार नाहीत. * मर्यादित संख्यनेच ट्रेन धावतील * इलाज सापडत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग हे सर्वात मोठं शस्त्र आहे. * 15 मेपर्यंत सर्व राज्यांनी ब्लू प्रिंट द्यावी

लॉकडाऊन संपवून चालणार नाही, कोरोनावर हा एकमात्र उपाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यांमधील संकेत लक्षात घेतले तर...

* 17 मेनंतरही लॉकडाऊन सुरु राहू शकतो * लॉकडाऊन-4 मध्ये जास्त सूट मिळू शकते * आर्थिक घडामोडींमध्ये वाढ होऊ शकते * राज्यांना लॉकडाऊनमध्ये निर्णय घेण्यासाठी जास्त अधिकार मिळू शकतात

आता एकीकडे कोरोनाशी मुकाबला आणि तर दुसरीकडे जगण्यासाठी सूट देण्याची अपरिहार्यता आहे. पंतप्रधानांनीही बैठकीत या आव्हानांचा उल्लेख केला...

* प्रादुर्भाव रोखणं आणि सार्वजनिक घडामोडी वाढवणं असं दुहेरी आव्हान आहे * गावांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखावा लागणार * वैद्यकीय आणि आरोग्याची पायाभूत सुविधा मजबूत करावी लागेल * शेतकऱ्यांसाठी रोडमॅप बनवावा लागेल * शिक्षणाच्या नव्या पद्धतींवर विचार करायला लागेल * आपल्याला नव्या विश्वाची तयार करावी लागेल * जगाची आता कोरोनाच्या आधी आणि कोरोनाच्या नंतर अशी विभागणी होईल.

लॉकडाऊन 4 ची शक्यता यामुळेही जास्त आहे की अनेक मुख्यमंत्री याच्या बाजूने आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी होऊ शकते.

मात्र लॉकडाऊन 4 ची अजून घोषणा झालेली नाही. परंतु गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रमोद सावंत म्हणाले की, "18 मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होईल." सोबतच यावेळी लॉकडाऊनमध्ये राज्यांना जास्त अधिकार दिल्याचंही सावंत यांनी सांगितलं.

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बैठकीत कोणते मुख्यमंत्री काय म्हणाले?

दिल्ली- अरविंद केजरीवाल * कन्टेन्मेंट झोन वगळता आर्थिक घडामोडी सुरु व्हाव्यात.

महाराष्ट्र- उद्धव ठाकरे * लॉकडाऊनचा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी लोकल ट्रेन सुरु केली जावी

उत्तर प्रदेश- योगी आदित्यनाथ * पंतप्रधानांच्या निर्णयासोबत राहून कोरोनाला हरवणार

पंजाब- कॅप्टन अमरिंदर सिंह * लॉकडाऊन वाढावा, पण राज्यांना आर्थिक पॅकेज मिळायला हवे

बिहार- नितीश कुमार * 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवावा, स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वेची धावाव्यात

पश्चिम बंगाल- ममता बॅनर्जी * सर्व निर्णय केंद्र सरकारने घ्यायचे आणि राज्यांना केवळ माहिती द्यायची हे योग्य नाही.

गुजरात- विजय रुपाणी * सहा शहरं वगळता, सर्व शहरांमध्ये उद्योगधंदे सुरु झाले.

राजस्थान- अशोक गहलोत * मनरेगाच्या धर्तीवर शहरी भागातही रोजगाराजी गॅरंटी योजना सुरु व्हावी.

छत्तीसगड- भूपेश बघेल * झोन निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारांना मिळावा.

झारखंड- हेमंत सोरोन * एका वर्षासाठी मनरेगा मजुरीमध्ये 50 टक्क्यांची वाढ करावी.

तेलंगणा- केसीआर * सध्या प्रवासी रेल्वे सुरु करु नये

Lockdown | 18 मे पासून चौथा लॉकडाऊन सुरू होणार? 15 मेपर्यंत आराखडा देण्याच्या पंतप्रधानांच्या सूचना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget