एक्स्प्लोर

लॉकडाऊन संपवून चालणार नाही, कोरोनावर हा एकमात्र उपाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजाराशी सामना करताना भारताला मिळालेल्या यशाला जागतिक मान्यता मिळाली आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या वतीने कौतुक केलं.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहार सुरु करण्यासाठी आणि टप्प्याटप्प्याने लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य सरकारांचे कौतुक केले. लॉकडाऊनला संपवून चालणार नाही. कोरोनाला हरवण्यासाठी हा एकमात्र उपाय आहे. राज्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार त्यात बदल करावेत, अशा सूचना नरेंद्र मोदी यांनी केल्या.

कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजाराशी सामना करताना भारताला मिळालेल्या यशाला जागतिक मान्यता मिळाली आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांचे भारत सरकार कौतुक करत आहे. कोरोनाच्या संकटापासून ग्रामीण भारत मुक्त राहावा यासाठीही आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं.

देशाच्या अनेक भागांमध्ये हळूहळू आर्थिक व्यवहार, उद्योग सुरू झाले आहेत. येत्या काळात अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी हे काम अधिक वेगाने होईल. कोरोनाविरुद्धच्या लढाईल आता लक्ष केंद्रीय करणे गरजेचं आहे. या मार्गावर पुढील काळात अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी रणनीती बनवून राबवली गेली पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

पुढच्या लॉकडाऊनबाबत 15 तारखेपूर्वी आपल्याला आपल्या राज्यात कशा प्रकारे तयारी करता येईल, याचा आराखडा तयार करून केंद्राकडे द्या. आम्ही त्यावर विचार करून 18 तारखेपासूनच्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात समाविष्ट करू. ग्रीन झोन्समध्येही आपल्याला लक्ष्य द्यावे लागणार आहे. आता मान्सून सुरु होईल. अनेक रोग या दरम्यान येतात, अशा वेळी आपले डॉक्टर, दवाखाने सज्ज ठेवावे लागतील, नवीन संकट नको, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

जगातला पर्यटन व्यवसाय संकटात आहे. भारताने या परिस्थितीत आपण बारकाईने विचार करून पर्यटनाचे नवे प्रकार विकसित करावेत. वर्षानुवर्षे काम केले ते ठिकाण सोडून मजूर आपल्या राज्यात चालले आहेत. त्यामुळे कामगारांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. ज्या राज्यात कामगार परतले आहेत तिथल्या राज्यांना देखील आव्हान असेल. राज्यांना यावर तोडगा काढावा लागेल, असं प्रंतप्रधान मोदींनी सांगितलं.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget