एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली नवी नियमावली, 'असे' असतील नियम

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधी नवी नियमावली जाहीर केली आहे.

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाच्या लसीच्या संबंधी आशादायक बातम्या येत असताना ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरात खळबळ उडाली असून देशोदेशींच्या सरकारांनी त्यावर उपाययोजना म्हणून पावले उचलायला सुरुवात केली आहे. भारतातही या नव्या स्ट्रेनसंबंधी केंर्द्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी नवी नियमावली जाहीर केली आहे.

25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या 4 आठवड्यांच्या दरम्यान ब्रिटनहून भारतातील विविध राज्यात आलेल्या सर्व प्रवाशांची माहिती घेण्याचे निर्देश ब्युरो ऑफ इमिग्रेशनला देण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन या प्रवाशांची माहिती संबंधित राज्यांना देणार आहे.

25 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या दरम्यान भारतात आलेल्या प्रवाशांची माहिती जिल्हा सर्व्हेक्षण अधिकाऱ्यांमार्फत घेण्यात येईल. अशा प्रवाशांमध्ये काही लक्षणं दिसत असतील तर त्यांची RT-PCR चाचणी घेण्यात येईल.

भारतात आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी त्यांचा गेल्या 14 दिवसांचा प्रवासाचा इतिहास आणि कोरोना चाचणी केलेला अहवाल जमा करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. ब्रिटनशी सुरु असलेल्या विमानसेवा या 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर किंवा पुढील आदेश प्राप्त् होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर या दरम्यान ब्रिटनमधून भारतात आलेल्या प्रवाशांसाठी खालील सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट करण्यात आली आहे याची खात्री करुन घ्यावी. असे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांची लॅबमधून spike gene-based RT-PCR ही चाचणी करण्यात यावी.

असे प्रवासी पॉझिटिव्ह सापडल्यास त्यांच्या इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनची वेगळी व्यवस्था करण्यात यावी. त्यांचे सॅम्पल्स पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे किंवा इतर संस्थामध्ये पाठवण्याची व्यवस्था करावी आणि त्याचे genomic sequencing करण्यात यावे.

जर त्यामध्ये संक्रमणाचा प्रसार करणाऱ्या व्हायरसचा शोध लागला तर भारतात यापूर्वी असलेल्या SOP नुसार त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत. जर अशा प्रकारचा व्हायरस नसेल तर होम आयसोलेशन करण्यात यावं.

जर रुग्णाच्या genomic sequencing मध्ये SARS-CoV-2 चा नवा स्ट्रेन सापडला तर संबंधित रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. त्यावर नियमानुसार उपचार करण्यात येणार आहेत. पॉझिटिव्ह आल्यानंतर 14 दिवसांनी पुन्हा एकदा RT-PCR चाचणी करण्यात येईल. त्यावेळी जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यानंतर संबंधित रुग्णाचे 24 तासात घेण्यात आलेले दोन वेगवेगळे नमुने निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत उपचार सुरुच राहतील.

ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चेक-इनच्या आधी प्रवाशांना SOP ची संपूर्ण माहिती देण्याची व्यवस्था संबंधित एअरलाइंन्सनी करावी.

ब्रिटनमध्ये लॉकडाउन कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. जगातल्या अनेक देशांनी ब्रिटनशी सुरु असलेल्या आपल्या विमानसेवा स्थगित केल्या आहेत. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनमुळे अनेक देशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हा स्ट्रेन निंयत्रणाच्या बाहेर नसल्याचं सांगून त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल असं स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोपSpecial Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget