एक्स्प्लोर
Advertisement
Lockdown 4.0 | तिसऱ्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस, चौथ्या टप्प्यासाठी आज गाईडलाईन्स घोषित होणार
लॉकडाऊनच्या (Lockdown 4.0 ) चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकार आज गाईडलाईन्स जारी करणार आहे. लॉकडाऊनचा आज 54 वा दिवस आहे. चौथा टप्पा उद्या, सोमवारपासून सुरु होणार आहे.
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन टप्प्यात लागू केलेल्या लॉकडाऊनचा आज 54 वा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्याचा हा शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या, सोमवारपासून सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकार आज गाईडलाईन्स जारी करणार आहे. आज सकाळी 11 वाजल्यानंतर या गाईडलाईन्स जारी होण्याची शक्यता आहे. पीएम मोदी यांनी मागील वेळी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन-4 संदर्भात घोषणा केली होती. लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह लागू केला जाईल. आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत. 18 मे पूर्वी लॉकडाऊन 4 ची माहिती दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. मात्र लॉकडाऊन 4 नव्या स्वरुपात असून याचे नियम वेगळे असतील असंही त्यांनी आवर्जून सांगितलं होतं.
लॉकडाऊनचे तीन टप्पे
पहिला लॉकडाऊन : 25 मार्च ते 14 एप्रिल
दुसरा लॉकडाऊन : 15 एप्रिल ते 3 मे
तिसरा लॉकडाऊन : 4 मे ते 17 मे
झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना मिळावं; चौथ्या लॉकडाऊनआधी राज्याची केंद्राकडे मागणी
चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स जाहीर करण्याअगोदर प्रत्येक राज्याने काही मागण्या केल्या आहेत. राज्यांनी केलेली सर्वात प्रमुख मागणी आहे, म्हणजे झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना मिळावं. आता झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य हे केंद्र सरकारकडे आहे. राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले आहेत. हे सर्व झोन केंद्राने तयार केलेल्या निकषावर आधारित आहेत. त्यामुळे आम्हाला झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.
Coronavirus | राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले : राजेश टोपे
राज्य सरकारचा हेतू काय?
झोनचे निकष ठरवण्याचं स्वातंत्र्य केंद्राकडे मागण्या पाठीमागे राज्याचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असूनही तिथे उद्योगधंद्यांना परवानगी देताना झोनच्या अडचणी येत आहे. त्यामुळे राज्यने केद्राकडे ही मागणी केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लॉकडाऊन-4 चं स्वरुप कसं असणार, किती वाढणार? सर्व मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांना सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 मे रोजी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांकडे 15 मेपर्यंत लॉकडाऊन संदर्भात मतं मागवली होती. बहुतेक सर्वच मुख्यमंत्र्यांनी काही सूचना पंतप्रधान कार्यालयाकडे केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मे महिन्याच्या शेवटपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचंही सूचवलं आहे. मात्र लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2 आणि लॉकडाऊन 3 पेक्षा वेगळे नियम असण्याची देखील चर्चा आहे.
VIDEO | Lockdown 4 | लॉकडाऊन 4 मध्ये तुमच्या शहरात काय सुरू काय बंद असेल?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
निवडणूक
Advertisement