Corona Update | तबलिगींमुळे देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
दिल्लीत पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर देशभरात कोरोना बाधितांचा संख्या वाढत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे,
नवी दिल्ली : तबलिगींमुळे देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशभरात आतापर्यंत 79 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 472 नवीन कोरोना बाधित रुग्ण देशात आढळले आहेत. जर तबलिगीची घटना झाली नसती तर कोरोना बाधितांचा संख्या 7.1 दिवसात दुप्पट झाली असती, मात्र आता 4.1 दिवसात ही संख्या दुप्पट होत आहे, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
सरकारच्या माहितीनुसार, तीन हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आज देशात आहेत. तबलिगींमुळे देशातील जवळपास 22 हजार लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. देशातील 30 केसेससाठी तबलिगी जबाबदार असल्याचं सरकारचं म्हणणं आहेत.
तबलिगी जमातकडून दिलगिरी व्यक्त
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तबलिगी जमातने शनिवारी दिलगिरी व्यक्त केली. तबलीगी जमातच्यावतीने सांगण्यात आलं की, पोलिसांना कोणत्याही प्रकारे सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. दिल्लीच्या तबलिगी जमात यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून दिलगिरी व्यक्त केली.
Sanjay Raut | देव, येशू, अल्लाह मदतीला येणार नाही, मरकज प्रकरणावर संजय राऊतांची टीका
संबंधित बातम्या
#Markaz | निजामुद्दीनमधलं 'मरकज' दिल्लीतल्या कोरोनाचं केंद्र, 'मरकज' म्हणजे नेमकं काय?
दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित, 'मरकज' चा संपूर्ण परिसर सील
Nizamuddin Markaz | 'मरकज' प्रकरणी मौलानासह काही जणांवर गुन्हा दाखल