Nizamuddin Markaz | 'मरकज' प्रकरणी मौलानासह काही जणांवर गुन्हा दाखल
मरकजमध्ये मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तोच कार्यक्रम देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत बनला. या प्रकरणात आता मौलानासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावरुन मौलाना मोहम्मद साद कांधलवी आणि तब्लिगी जमातच्या इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामारी कायदा 1897 आणि भारतीय दंड विधानांच्या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. मरकजमध्ये मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तोच कार्यक्रम देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत बनला. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर निजामुद्दीच्या मरकजमध्ये सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आदेशाचं उल्लंघन करत कार्यक्रमाचं आयोजन झालं. हे प्रकरण दिल्ली क्राईम ब्रान्चकडे सोपवण्यात येणार असून लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशी सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर खबरदारी म्हणून धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहेत. तरीही या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि त्यामधून कोरोनाचा संसर्गही झाला.
दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित, 'मरकज' चा संपूर्ण परिसर सील
इथे सापडलेल्या बहुतांश लोकांना विविध विलगीकरण कक्षात आणि रुग्णालयातील विलगीकरण वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 16 देशांमधील नागरिकांसह एकूण 1830 जण 24 मार्च रोजी 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतरही तब्लिगी जमातच्या मरकजमध्ये होते. गृहमंत्रालयाने सांगितलं की, 303 तब्लिगींना COVID-19 ची लागण झाली असून त्यांना दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय म्हणाले? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मरकजच्या आयोजनावर कठोर भूमिका घेतली होती. कोरोनाच्या साथीमुळे नवरात्रीतही लोक मंदिरात येत नव्हते. गुरुद्वारे बंद करण्यात आले. मग अशावेळी मरकजमध्ये लोकांना एकत्रित करणं योग्य नव्हतं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अरविंद केजरीवाल यांना 30 मार्च रोजी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. केजरीवाल यांच्या माहितीनुसार, 1548 जणांना मरकजमधून बाहेर काढण्यात आलं आहे. 441 जणांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसली होती. सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्या 1107 लोकांमध्ये कोरोनाची लक्षण नव्हती त्यांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. दिल्लीमधील 97 कोरोनाबाधितांपैकी 24 जण निजामुद्दीन मरकजचे आहेत." तसंच "नियम मोडणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर कारवाई करायला हवी," असं केजरीवाल म्हणाले.
दिल्लीतील निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील अनेकांचा सहभाग, सर्वांचा शोध सुरु
मरकज म्हणजे काय? दिल्लीतील निजामुद्दीन इथे जे मरकज (उर्दू शब्द) आहे, त्याला तब्लिग जमातीचे संस्थान असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिग जमातीच्या मशिदी असतात. त्या मशिदींपैकी एक मुख्य मशीद ही मरकज असते अर्थात त्याला संस्थान म्हणतात. (उदा. पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत, त्यांची एका मुख्य मशिदीमध्ये सर्वांना माहिती जमा करावी लागते. कोण-कुठे-कधी आणि किती दिवस बाहेरच्या शहरात-राज्यात जमातीसाठी जातात) देशातील या सर्व मरकजची शिखर संस्था ही दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. इथे परदेशात जमातीला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लीम तब्लिगी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. पण कोरोनामुळे प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं. मरकजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. (जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्याइतका असतो, या जमातीमध्ये प्रबोधन केले जाते)
Coronavirus | Nizamuddin Markaz | दिल्लीतील निजामुद्दीन मरकज परिसर पोलिसांकडून सील