एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#Markaz | निजामुद्दीनमधलं 'मरकज' दिल्लीतल्या कोरोनाचं केंद्र, 'मरकज' म्हणजे नेमकं काय?
कोरोना संसर्गाचं दिल्लीतील केंद्र ठरलेला निजामुद्दीन परिसर कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित केला आहे. 'मरकज' आयोजित केलेला संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मुस्लिम बांधवांचा धार्मिक कार्यक्रम असलेला 'मरकज' म्हणजे नेमका काय आहे.
मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असताना दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या 'मरकज' कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आता निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम 'मरकज' बंद करण्यात आला आहे. कार्यक्रम बंद केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे. काल रात्री उशीरापर्यंत हा परिसर रिकामा करण्याचं काम सुरु होतं. आता या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. हे ठिकाण दिल्लीतल्या कोरोना प्रादुर्भावाचं सगळ्यात मोठं केंद्र बनलाय आणि महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
मरकज म्हणजे काय?
दिल्लीतील निजामुद्दीन येथे जे 'मरकज' (उर्दू शब्द) सुरु होतं त्याला तब्लिक जमातीत 'संस्थान' असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिक जमातीच्या मशिदी असतात. त्या मशिदींपैकी एक मुख्य मशीद ही मरकज असते अर्थात त्याला संस्थान म्हणतात. (उदा- पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत, त्यांची एका मुख्य मशिदीमध्ये सर्वांना माहिती जमा करावी लागते. कोण-कुठं-कधी आणि किती दिवस बाहेरच्या शहरात-राज्यात जमातीसाठी जातात, अशी माहिती तिथं द्यावी लागते) देशातील या सर्व मरकजची शिखर संस्था ही दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. इथे परदेशात जमातीला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लिम तब्लिकी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. पण कोरोनामुळं प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं. मरकजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. या जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्यांइतका असतो, या जमातीमध्ये प्रबोधन केले जाते. (ही माहिती पिंपरी चिंचवडमधील मुस्लिम समाजातील अभ्यासू व्यक्तीकडून घेतलेली आहे.)
Special Report | निजामुद्दीनमधून देशभरात कसा पसरला कोरोना? 24जण पॉझिटिव्ह, 334रुग्णालयात, 700क्वॉरंटाईन
राज्यातून मरकजसाठी गेलेल्यांचा शोध सुरु
दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. मरकजमधील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेले 47 जण औरंगाबाद शहरात परत आले आहेत. औरंगाबादेत आतापर्यंत 40 जणांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे मिळून किमान 136 व्यक्ती आहेत, जे दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांना क्वॉरंटाईन करणं सुरू झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील 16 जण उपस्थित असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील 16 जणांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. यामध्ये शहरी भागातील 6 तर ग्रामीण भागातील 10 जणांचा समावेश आहे. चंद्रपूरच्या राजुरा शहरातही एक संशयित रुग्ण आढळला. निजामुद्दीनमधील कार्यक्रमातून हा व्यक्ती परतला आहे. सदर व्यक्तीला सध्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील 13 लोकांचा समावेश होता. अकोल्यातील 4, बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यातील प्रत्येकी 3 जणांचा यामध्ये समावेश आहे. परभणीत देखील दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन येथील जमातमध्ये गेलेले 3 जण परतले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हजरत निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित
हजरत निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या संसर्गाचं केंद्र ठरलेल्या दिल्लीतील या धार्मिक स्थळी 2137 जण सहभागी झाले होते. या ठिकाणी आलेल्या 2137 पैकी 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे. यापैकी 1203 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 10 राज्यात 800 लोकांचा शोध सुरु आता सुरु आहे. यांच्या संपर्कातल्या आलेल्यांचे आकडे हजारात असू शकतात. जानेवारीपासून 2 हजार विदेशी तब्लिगी भारतात दाखल झाले होते, अशी देखील माहिती आहे.
विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्रालयाने मरकजमध्ये सामील लोकांची लिस्ट 21 मार्चलाच सर्व राज्यांना कळवली होती. 19 मार्चला जेव्हा तेलंगणामध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेले 19 जण पॉझिटिव्ह आढळले होते त्याचवेळी केंद्राने राज्यांना कळवले होते. आज त्याला दहा दिवस पूर्ण होत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement