एक्स्प्लोर

दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित, 'मरकज' चा संपूर्ण परिसर सील

दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. आता हा परिसर सील करण्यात आलाय.महाराष्ट्रातून या धार्मिक कार्यक्रमाला अनेकजण गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शोध सुरु आहे.

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या 'मरकज' कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आता निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम 'मरकज' बंद करण्यात आला आहे. कार्यक्रम बंद केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे. काल रात्री उशीरापर्यंत हा परिसर रिकामा करण्याचं काम सुरु होतं. आता या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. हे ठिकाण दिल्लीतल्या कोरोना प्रादुर्भावाचं सगळ्यात मोठं केंद्र बनलाय आणि महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. हजरत निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित हजरत निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या संसर्गाचं केंद्र ठरलेल्या दिल्लीतील या धार्मिक स्थळी 2137 जण सहभागी झाले होते. या ठिकाणी आलेल्या 2137 पैकी 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे. यापैकी 1203 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 10 राज्यात 800 लोकांचा शोध सुरु आता सुरु आहे. यांच्या संपर्कातल्या आलेल्यांचे आकडे हजारात असू शकतात. जानेवारीपासून 2 हजार विदेशी तब्लिगी भारतात दाखल झाले होते, अशी देखील माहिती आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्रालयाने मरकजमध्ये सामील लोकांची लिस्ट 21 मार्चलाच सर्व राज्यांना कळवली होती. 19 मार्चला जेव्हा तेलंगणामध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेले 19 जण पॉझिटिव्ह आढळले होते त्याचवेळी केंद्राने राज्यांना कळवले होते. आज त्याला दहा दिवस पूर्ण होत आहेत. Special Report | निजामुद्दीनमधून देशभरात कसा पसरला कोरोना? 24जण पॉझिटिव्ह, 334रुग्णालयात, 700क्वॉरंटाईन राज्यातून मरकजसाठी गेलेल्यांचा शोध सुरु दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे.  महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.  मरकजमधील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेले 47 जण औरंगाबाद शहरात परत आले आहेत. औरंगाबादेत आतापर्यंत 40 जणांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे मिळून किमान 136 व्यक्ती आहेत, जे दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांना क्वॉरंटाईन करणं सुरू झालं आहे.  सोलापूर जिल्ह्यातील 16 जण उपस्थित असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील 16 जणांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. यामध्ये शहरी भागातील 6 तर ग्रामीण भागातील 10 जणांचा समावेश आहे. चंद्रपूरच्या राजुरा शहरातही एक संशयित रुग्ण आढळला. निजामुद्दीनमधील कार्यक्रमातून हा व्यक्ती परतला आहे. सदर व्यक्तीला सध्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील 13 लोकांचा समावेश होता.  अकोल्यातील 4, बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यातील प्रत्येकी 3 जणांचा यामध्ये समावेश आहे. परभणीत देखील दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन येथील जमातमध्ये गेलेले 3 जण परतले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi Airport : आनंदाची बातमी! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठरणार केंद्रबिंदू
आनंदाची बातमी! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठरणार केंद्रबिंदू
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
Raigad Crime News : सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 31 March 2025Kunal Kamra News : वकिलांसोबत कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यताBeed Crime News : भावाचा मृत्यू, 2 वर्षांपूर्वीचा राग, सततच्या धमक्या; 'दादा-वहिणी'कडून 'त्याची' दगडाने ठेचून हत्याABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08 AM 31 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Airport : आनंदाची बातमी! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठरणार केंद्रबिंदू
आनंदाची बातमी! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठरणार केंद्रबिंदू
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
Raigad Crime News : सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
Video : भरधाव लॅम्बोर्गिनीने फुटपाथवर बसलेल्या अनेक कामगारांना चिरडले, लोक धावत येताच म्हणाला, कोणं मेलं आहे का? मी टेस्ट ड्राईव्ह घेत होतो
Video : भरधाव लॅम्बोर्गिनीने फुटपाथवर बसलेल्या अनेक कामगारांना चिरडले, लोक धावत येताच म्हणाला, कोणं मेलं आहे का? मी टेस्ट ड्राईव्ह घेत होतो
Kolhapur Football : कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
Raj Thackeray Speech: छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला विक्की कौशल मेल्यावर कळलं? भर सभेत राज ठाकरेंचा थेट सवाल अन्...
संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला विक्की कौशल मेल्यावर कळलं? राज ठाकरेंनी हौशा-गवशाॉ हिंदुत्त्ववाद्यांना सुनावलं
"स्वतःच्या आया, बहिणींचे व्हिडीओ जाऊन बघा, त्यांचंही शरीर माझ्यासारखंच..." 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचा संताप
Embed widget