एक्स्प्लोर

Nizamuddin Markaz | रत्नागिरीचं मरकज कनेक्शन उघड

रत्नागिरीतील एक रूग्ण हा 19 मार्च रोजी कोरोनाबाधित आढळून आला होता. दुबईहून आलेल्या 50 वर्षाच्या रूग्णाला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होते. त्यानंतर त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दिल्लीतील निजामुद्दीन मुस्लिम बांधवांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारो जण येथे जमले होते. दरम्यान साऱ्या घडामोडीनंतर निजीमुद्दीनमधील मरकज हे कोरोनाचं हॉटस्पॉट म्हणून देखील घोषित करण्यात आले. देशासह विदेशातील मुस्लिम बांधव देखील या ठिकाणी जमले होते. यानंतर देशातल्या मकरज येथे गेलेल्यांचा देखील शोध घेतला गेला. अनेकांना क्वारंटाईन देखील करून ठेवण्यात आले आहे. यापैकी काही जण हे कोरोनाबाधित झाल्याचं देखील आता समोर आले आहे. या साऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा आता शोध घेतला जात आहे. दरम्यान, आता मरकजचं रत्नागिरी कनेक्शन देखील समोर आले आहे. रत्नागिरीतील तिघे जण या ठिकाणी गेले होते. त्यापैकी एकाला मुंबईमध्ये, एकाला आग्रामध्ये आणि एकाला रत्नागिरी जिल्हा सिव्हिल रूग्णालयात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. या बाबतची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. हा विषय संवेदनशील आणि गंभीर आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केले आहे. रत्नागिरीतील सिव्हिल रूग्णालयात दाखल केलेल्या रूग्णावर सध्या डॉक्टरांचे देखील लक्ष आहे काय आहे रत्नागिरीतील कोरोनाची स्थिती? रत्नागिरीतील एक रूग्ण हा 19 मार्च रोजी कोरोनाबाधित आढळून आला होता. दुबईहून आलेल्या 50 वर्षाच्या रूग्णाला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होते. त्यानंतर त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या पत्नीचे आणि भावाचे रिपोर्ट देखील केले गेले. ते देखील निगेटिव्ह आले. महत्त्वाची बाब म्हणजे रत्नागिरीतील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाचे आतापर्यंत केलेले दोन्ही रिपोर्ट हे निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरीत सध्याच्या घडीला तरी कोरोनाबाधितांची संख्या शून्य झाली आहे. पण, त्यानंतर देखील जिल्हा प्रशासन खबरदार असून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. शिवाय, शेकडो लोकांना होम क्वारंटाईन देखील करून ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्याहून आलेल्यांवर देखील आता विशेष लक्ष ठेवले जात आहे. Nijamuddin Corona | निजामुद्दीनमध्ये हजेरी लावणारे उत्तर प्रदेशमधील 97 जण कोरोना पॉझिटिव्ह   गाव जवळ करण्याची धडपड कोकणी माणूस मोठ्या प्रमाणावर सध्या मुंबई आणि पुण्यामध्ये कामाकरता स्थायिक झाला आहे. पण, लॉकडाऊननंतर तो आता आपल्या गावाकडे निघाला आहे. रस्ते बंद असले तरी समुद्र मार्गे, जंगलाचा आडोसा घेत किंवा अगदी कोकण रेल्वेच्या ट्रकवरून गावी निघाला आहे. यापैकी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेत तपासणीअंती क्वारंटाईन देखील करून ठेवले आहे. 'प्रेस'चा बोर्ड वापरून मुंबई - रत्नागिरी प्रवास पत्रकारांना सध्याच्या घडीला काही प्रमाणात मुभा देण्यात आली आहे. ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांना सोडले जात आहे. याचाच फायदा घेत आपल्या फोर व्हिलरवर 'प्रेस'चा बोर्ड लावत चार मुली रत्नागिरीत दाखल झाल्या. पण, पोलिसांनी त्यांची ही लबाडी पकडली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर गु्न्हा देखील नोंदवण्यात आला. संबंधित बातम्या :
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
NCP Sharad Pawar: BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'
BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'

व्हिडीओ

Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
NCP Sharad Pawar: BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'
BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'
BMC Election 2026: मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?
Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?
ठाकरेंच्या युतीच्या घोषणावेळी संजय राऊतांना खास खुर्ची, मग बाळा नांदगावकर कुठे होते? मोठी माहिती समोर
ठाकरेंच्या युतीच्या घोषणावेळी संजय राऊतांना खास खुर्ची, मग बाळा नांदगावकर कुठे होते? मोठी माहिती समोर
Raj Thackeray Alliance Announced : शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय
Raj Thackeray Alliance Announced : शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय
Embed widget