Coronavirus | देशातील कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार, 62 जिल्ह्यात 80 टक्के रुग्ण!
सध्या सात दिवसांऐवजी चार दिवसातच रुग्ण दुप्पट होऊ लागले आहेत. दिल्लीतील तब्लिगी जमातीचा कार्यक्रमामुळे कोरोना फैलावाचा वेग आणखी वाढल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.
मुंबई : कोरोना व्हायरस देशात वेगाने पसरत आहे. मागील एका आठवड्यात भारतामधील कोरोनाबाधितांची संख्या आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा वेगाने वाढत आहे. विशेष म्हणजे देशातील 62 जिल्ह्यात तब्बल 80 टक्के कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. 14 एप्रिल रोजी देशातील लॉकडाऊन संपल्यानंतरही या जिल्ह्यांमध्ये सक्ती कायम राहण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तवली आहे. देशात आतापर्यंत 274 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट आहे.
मागील 24 तासात देशभरात कोरोनाची लागण झालेले 505 नवे रुग्ण समोर आले आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढून चार हजारांच्या पार पोहोचली आहे आणि 100 अधिक जणांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.
Coronavirus : भारतात कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार, तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
सूत्रांच्या माहितीनुसार, 'कोरोनाच्या प्रसारात एक स्पष्ट भौगोलिक दृष्टीकोनही आहे. देशाच्या 62 जिल्ह्यांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. आम्ही भीलवाडा मॉडेलवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आम्ही तपासणीची संख्या वाढवत आहोत. मागील दोन दिवसात तपासणीची संख्या दुप्पट झाली आहे. पुढील काही दिवसात ही संख्या पुन्हा एकदा दुप्पट होईल.
Lock Down | फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणारा गोळ्या घालून ठार!
ज्या 62 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची लागणी झालेले रुग्ण आहेत, ते सील केले जातील. ही रणनीती भीलवाडामध्ये परिणामकारक ठरली होती. मागील महिन्यात राजस्थानमधील भीलवाडा कोरोना झोन बनला होता. मात्र इथल्या डॉक्टरांनी 14 दिवसातच 26 कोरोनाबाधितांना ठणठणीत बरं केलं. त्यांचे तिसरे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर, आणखी काही तपासणी करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
Mumbai Corona Update | मुंबईत 433 कोरोनाबाधित, मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट नेमके कोणते? India Lockdown | लॉकडाऊननंतरही सर्व जिल्ह्यांच्या सीमा दोन आठवडे बंद राहणार,सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना