एक्स्प्लोर

Coronavirus : कोरोनाचा भारतात कहर! 4000 पार कोरोना बाधितांची संख्या, तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

भारतात कोरोना बाधितांचा आकडा 4000 पार गेला असून तब्लिगींमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कोरोनापुढे अख्खं जग हतबल झालं असून भारतातही कोरोना फोफावत आहे. रविवारी राजस्थान, गुजरातमध्ये प्रत्येकी एक-एक, महाराष्ट्रात तीन आणि तामिळनाडूमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच आंध्रप्रदेशमध्ये 34, महाराष्ट्रात 26, राजस्थानमध्ये सहा, गुजरातमध्ये 14, मध्यप्रदेशमध्ये 12 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून कोरोना बाधितांचा एकूण आकडा 4000 वर पोहोचला आहे. तर देशात या व्हायरसमुळे आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीमध्ये तब्लिगींमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ

आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 4000 कोरोना बाधितांपैकी 291 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाचे 58 नवीन रूग्ण आढळून आले. राज्यामध्ये आतापर्यंत संख्या 500 पार पोहोचली आहे. तर फक्त दिल्लीमध्ये 320 कोरोना बाधित आहेत.

पाहा व्हिडीओ : मुंबईत 433 कोरोनाबाधित, मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट नेमके कोणते?

कोणत्या राज्यात किती रूग्णांचा मृत्यू?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 11, तेलंगणामध्ये 7, मध्यप्रदेशमध्ये 9, दिल्लीमध्ये 7, पंजाबमध्ये 5, कर्नाटकात 4, पश्चिम बंगालमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये प्रत्येकी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये तीन, आंध्रप्रदेश, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोणत्या राज्यात किती कोरोना बाधित?

Coronavirus : कोरोनाचा भारतात कहर! 4000 पार कोरोना बाधितांची संख्या, तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

Coronavirus : कोरोनाचा भारतात कहर! 4000 पार कोरोना बाधितांची संख्या, तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

तब्लिगींमुळे वाढली कोरोना बाधितांची संख्या

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर तब्लिगी जमातीतील लोकांना कोरोनाची बाधा झाली नसती तर देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत वेगळी असती. फक्त तब्लिगींमुळे 21 राज्यांत एकूण 1095 कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, आतापर्यंत देशात 274 जिल्हे कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत.

मरकज प्रकरण नसतं झालं तर भारताचा कोरोना संसर्ग दर अत्यंत कमी असता, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अग्रवाल यांनी सांगितलं. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, 'Covid-19 चे रूग्ण सध्याच्या स्थितीत दिवसाला सरासरी 4.1 असे दुप्पटीने वाढत आहेत.

संबंधित बातम्या :

Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा

Corona Update | तबलिगींमुळे देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

#Markaz | निजामुद्दीनमधलं 'मरकज' दिल्लीतल्या कोरोनाचं केंद्र, 'मरकज' म्हणजे नेमकं काय?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार

Embed widget