एक्स्प्लोर
मध्य प्रदेशात सरकारने विधेयकावरील ठराव जिंकला, भाजपच्या दोन आमदारांचंही समर्थन
क्रिमिनल लॉ विधेयकावरील ठरावावेळी काँग्रेसला 122 आमदारांनी समर्थन दिलं, ज्यात भाजपच्या दोन आमदारांचाही समावेश होता.

भोपाळ : मध्य प्रदेशातही कर्नाटकसारखाच राजकीय पेच निर्माण करण्याचा दावा करणाऱ्या भाजपला काँग्रेसने मोठा दणका दिला आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभेत आज झालेल्या क्रिमिनल लॉ विधेयकावरील ठरावावेळी काँग्रेसला 122 आमदारांनी समर्थन दिलं, ज्यात भाजपच्या दोन आमदारांचाही समावेश होता. विधेयकावरील मतदानात बहुमत मिळवत काँग्रेसने मध्यप्रदेशात आपली सत्ता राखण्यात यश मिळवल्याचं बोललं जात आहे. तसंच भाजपचे सत्तांतराचे मनसुबे हाणून पाडले आहेत. भाजप आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कोल यांनी काँग्रेसच्या पारड्यात आपलं मत टाकलं आहे. काँग्रेसने पुढील 5 वर्षात लोकांच्या हितासाठी काम करत राहणार असल्याचं सांगितलं. भाजपला ठरावावेळी काँग्रेसने मात दिल्यानंतर विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं. तर काँग्रेसच्या बाजूने मतदान केलेल्या नारायण त्रिपाठींनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. मला पक्षात सापत्न वागणूक दिली जाते, त्यामुळे गेल्या काही काळापासून पक्षात घुसमट होत असल्याने काँग्रेसला मतदान केल्याचंही ते म्हणाले. भाजप सकाळपासूनच मध्यप्रदेशात सरकार पाडण्याचा दावा करत होते, मात्र काँग्रेसने क्रिमिनल लॉ विधेयकावर बहुमत सिद्ध करत भाजपच्या दोन आमदारांनाही आपल्या गोटात सामील करुन घेतल्याचं बोललं जात आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण























