खोटं पसरवणारं आणि फुकाच्या घोषणा देणारं गुप्त मंत्रालय हेच सर्वात सक्रिय; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका
मोदी सरकारचे कोणतेही मंत्रालय हे सध्या सक्रिय नसून केवळ खोटं पसरवणं आणि फुकाच्या घोषणा देण्याचं काम सुरु असल्याची टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.
![खोटं पसरवणारं आणि फुकाच्या घोषणा देणारं गुप्त मंत्रालय हेच सर्वात सक्रिय; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका Congress Rahul Gandhi says the secret Ministry for Lies and Empty slogans is most efficient ministry खोटं पसरवणारं आणि फुकाच्या घोषणा देणारं गुप्त मंत्रालय हेच सर्वात सक्रिय; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/06/97aad82c1ee2a1df613ac91d10bf5a28_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : देशातील कोरोनाची परिस्थिती केंद्र सरकारने ज्या पद्धतीने हाताळली आहे त्यावरुन काँग्रेसने सातत्याने टीका केली आहे. आताही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना देशात केवळ खोटं पसरवणं आणि फुकाच्या घोषणा देण्याचं काम सुरु असून तेच गुप्त मंत्रालय सर्वात सक्रिय मंत्रालय असल्याचं सांगितलं.
राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. आज त्यांनी आपल्या एका ट्वीटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली असून त्यात म्हटलं आहे की, "देशातील सर्वात सक्रिय मंत्रालय कोणतं आहे? खोटं पसरवणारं आणि फुकाच्या घोषणा देणारं गुप्त मंत्रालय हेच सर्वात सक्रिय मंत्रालय आहे."
- Which is GOI’s most efficient ministry?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 13, 2021
- The secret Ministry for Lies & Empty slogans
शनिवारी राहुल गांधी यांनी देशातील वाढती महागाई आणि इतर प्रश्नावरुन केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. ते म्हणाले की, देशातील महागाई, महामारी आणि बेरोजगारीची समस्या समोर असतानाही कोण यावर मौन पत्करलं आहे हे देशातील प्रत्येकजण जाणतो.
महामारी, महंगाई, बेरोज़गारी
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 12, 2021
जो सब देखकर भी बैठा है मौन
जन-जन देश का जानता है- #ZimmedarKaun
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर अनेकदा टीका केली आहे. देशातल्या अनेक नागरिकांकडे इंटरनेट नाही, त्यांना लसीकरणाचा अधिकार नाही का असा सवाल करत त्यांनी लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाचं लसीकरण होण आवश्यक आहे अशी मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut : राजकारण हे चंचल, कोणालाही मुठीत ठेवायला जमलं नाही; संजय राऊत यांचा पंतप्रधानांना टोला
- पँगाँग त्सोमध्ये गस्त घालण्यासाठी सैन्याला मिळाल्या नौका; लडाखमध्ये भारताचं पारडं होणार आणखी जड
- 'शस्त्र टाकणार असाल तर तुमच्या सल्ल्याचा विचार करु'; मराठा समाजाला पत्र धाडणाऱ्या नक्षलवाद्यांना मराठा युवा संघाचं प्रत्युत्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)