एक्स्प्लोर

'शस्त्र टाकणार असाल तर तुमच्या सल्ल्याचा विचार करु'; मराठा समाजाला पत्र धाडणाऱ्या नक्षलवाद्यांना मराठा युवा संघाचं प्रत्युत्तर

मराठा समाजाला पत्र धाडणाऱ्या नक्षलवाद्यांना मराठा युवा संघानं प्रत्युत्तर दिलं आहे. मराठा समाजाला पत्र पाठवण्याऐवजी मागास, आदिवासी, दलित समाजाचा उद्धार करा. शस्त्र खाली ठेवणार असाल तर तुमच्या सल्ल्याचा विचार केला जाईल, असं मराठा युवा संघानं पत्रकातून म्हटलं आहे.

नागपूर : दलाल नेत्यांच्या अमिषाला बळी पडू नका, आमच्यात सामील व्हा; अशी साद नधलवाद्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनात उतरणाऱ्या तरुणांना पत्राच्या माध्यमातून घातली होती. आता या नक्षलवाद्यांच्या पत्राला मराठा संघटनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमची संविधानावर निष्ठा आहे, मराठा समाज चुकीच्या मार्गावर जाणार नाही, असं मराठा युवा संघानं नक्षलवाद्यांना ठणकावून सांगितलं आहे. तर मराठा समाजाचं प्रबोधन करणारी पत्रकं काढण्याऐवजी नक्षलवाद्यांनी आदिवासी, मागास आणि दलित समाजाच्या उद्धारासाठी काम करावं, असं आवाहन पत्रकातून करण्यात आलं आहे. शस्त्र खाली टाकून शरणागती पत्कणार असतील, तर त्यांच्या सल्ल्याचा नक्की विचार केला जाईल, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. 

आमची संविधानावर निष्ठा आहे. जे भारतीय सैन्याविरोधात काम करतात अशा नक्षलवाद्यांकडून आम्हाला प्रेरणेची, सल्ल्याची गरज नाही. तुमचा सल्ला अनावश्यक आहे. अशा पद्धतीनं परखड भाषेत आता मराठा संघटनांनी नक्षलवाद्यांच्या पत्राला प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या मराठा युवा संघानं हे पत्रक काढलं आहे, त्याचे अध्यक्ष महेश महाडिक एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, "ज्या लोकांनी मराठा समाजाला उद्देशून पत्रक काढलं आहे. ते दहशत निर्माण करणारे लोक आहेत. साधरण आदिवासी लोकांना, पोलिसांना या व्यक्ती टार्गेट करतात आणि देशाच्या संविधानालाही मानत नाहीत. अशा लोकांनी आमच्या समर्थनार्थ पत्रक काढलं ते आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही माध्यमांमधून त्यांना आवाहन करतो की, जर खरचं तुम्हाला पत्रक काढून समर्थन करायचं असेल, तर तुम्ही या संविधानासमोर शस्त्र टाकून आत्मसमर्थन करावं, लोकशाहीचा मान सन्मान करुन नंतरच मराठा समाजाला समर्थन द्यावं. हेच आमचं त्यांना आवाहन आहे."


शस्त्र टाकणार असाल तर तुमच्या सल्ल्याचा विचार करु'; मराठा समाजाला पत्र धाडणाऱ्या नक्षलवाद्यांना मराठा युवा संघाचं प्रत्युत्तर

'मराठ्यांनो दलाल नेत्यांपासून सावध राहा', गडचिरोलीत नक्षलवादी संघटनेकडून पत्रक जारी

मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनात आता नक्षलवादी संघटनेने उडी घेतली आहे. "मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा," या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. "आमच्यामध्ये सामील व्हा," असं आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केलं आहे. हे सरकार केवळ अंबानी-अदानीचं आहे, त्यामुळे आरक्षण सोडून व्यवस्था बदलासाठी तयार राहा असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य निर्मितीची आठवण करुन देत मराठा तरुणांना भावनिकदृष्ट्या आकर्षित करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याआड नक्षलवादी नवा डाव रचत आहेत. नक्षलीवादी या आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

'मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे'

नक्षलवाद्यांच्या पत्रकात म्हटलं आहे की, "मराठा समाजातून मूठभर जे दलाल भांडवलदार निर्माण झाले आहेत, तेच खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या अधोगतीला जबाबदार आहेत. या अधोगतीचं स्वरुप सामाजिक नसून आर्थिक आहे. या आर्थिक अधोगतीला कारणीभूत सरकारांचे आजवरचे धोरणे आहेत. तेव्हा मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे."

'आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची वाट पाहत आहोत'

"शिवबांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मराठा समाजाने पुढाकार घेतला होता, पुन्हा पुढाकार घ्यायची वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मावळे बनावे लागेल. परत एकदा गनिमी काव्याचे डावपेच वापरावे लागतील. शत्रू, व्यवस्थेचे रखवाल, साम्राज्यवादाचे दलाल सत्ताधारी वर्ग आहेत. मित्र, सर्वच समाजातील गोरगरीब जनता आहे. मैदानात माओवादी शस्त्र उचलून लढत आहेत. लक्ष्य, मार्ग, साधने तयार आहेत. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळ्यांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्यासाठी मैदानात उतरावे. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची वाट पाहत आहोत," असंही नक्षली संघटनेने या पत्रकात म्हटलं आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करणे नक्षल्यांच्या नव्या रणनीतीचा भाग, सूत्रांची माहिती

व्यवस्था परिवर्तनाच्या नावावर सुरू असलेल्या नक्षल्यांच्या कथित सशस्त्र चळवळीत शहरी तरुणांना सहभागी करून घेण्याच्या नव्या रणनितीतूनच मराठा आरक्षणाच्या  (Maratha Resevation)   मुद्द्यावर नक्षल्यांनी पत्रक काढल्याचे माहिती आता पुढे येत आहे. यामागे दंडकारण्य केंद्रीय समितीचा सदस्य  कुख्यात माओवादी मिलिंद तेलतुंबडेची भूमिका असून हे पत्रक देखील त्यानेच काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकामध्ये ज्या सह्याद्री नावाचा उल्लेख आहे. त्या नावाचा वापर तेलतुंबडेच करतो असे जाणकारांचे म्हणणे आहे. जातीगत आरक्षणाच्या विरोध हा नक्षल्यांच्या मुख्य विचारधारेचा भाग आहे. म्हणूनच त्यांनी आरक्षणाच्या मागणीवर अधिक भर न देता व्यवस्थेविरोधात असंतोष कसा निर्माण होईल व तरुणांना कशाप्रकारे कथित क्रांतीसाठी प्रवृत्त करता येईल. हाच मुख्य उद्देश या पत्रातून दिसून येतो. त्यामुळे मराठा आंदोलनासमोर ही नवी समस्या तर निर्माण होणार नाही अशी शंका आता व्यक्त करण्यात येत आहे.

माओवाद्यांची भूमिका आरक्षण विरोधी अति डाव्या व अति उजव्या या दोन्ही विचारधारेमध्ये जातीगत आरक्षणाला मान्यताच नाही. त्यामुळे आरक्षणासंदर्भात माओवाद्यांची भूमिका कट्टर दुश्मन समजल्या अती उजव्या संघटनांशी मिळतीजुळती असल्याचे दिसून येते. या पत्रकामध्ये नक्षल्यांनी ज्या प्रकारे वाक्यप्रयोग केले आहेत त्यात मराठा समाजाला घटनात्मक मार्गाऐवजी हिंसेचा मार्ग त्यांनी सुचविला आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्यावेळेस काही ठिकाणी हिंसक घडामोडी घडल्या होत्या. तेव्हा या आंदोलनात नक्षल्यांनी शिरकाव केला असा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. आता पुन्हा या आंदोलनावर नक्षलवाद्यांच्या कथित चळवळीचे संकट दिसून येत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget